नंदुरबार – येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना तरुण उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने सनातन संस्थेच्या संस्कार वह्यांचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सनातन संस्थेची संस्कार वही विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभावना जागृत ठेवण्यासाठी निश्चित प्रेरणा देत राहील, असा विश्वास या प्रसंगी नितेश अग्रवाल यांनी व्यक्त केला.
या छोटेखानी समारंभाप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे नंदुरबार सेवक प्राध्यापक सतीश बागुल तसेच स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय. एस पाटील आणि शिक्षक व शिक्षिका उपस्थित उपस्थित होते.
नितेश अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मनुष्याला ज्ञानच वैभव शाली बनवते. सनातन संस्थेची वही नुसती वही नाही तर संस्कार वही असून आपल्या संस्कृतीचे ज्ञान देणारी वही आहे. यातूनच विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्र आणि समाज यांच्या प्रति योगदान देण्याची प्रवृत्ती निर्माण व्हायला सहाय्य होईल. हिंदू संस्कृतीच्या प्रचार प्रसाराचे ज्ञान विद्यार्थ्यांना लाभेल, असा विश्वास वाटतो म्हणूनच आमच्या वतीने विद्यार्थ्यांना या वह्यांची भेट देण्यात व या वही वाटप उपक्रमात सहभाग देण्यात विशेष आनंद वाटला; असे नितेश अग्रवाल म्हणाले.
प्रारंभी हिंदू जनजागृती समितीचे नंदुरबार सेवक सतीश बागुल यांनी संस्कार वहीचे महत्त्व व विद्यार्थ्यांनी रोजच्या जीवनात कसे आचरण करावे याविषयी मार्गदर्शन केले, तर आभार प्रदर्शन श्री निंबा माळी यांनी केले. सूत्रसंचालन विजय माळी यांनी केले.
———