तसाभरात पोलिसांनी 96 हजाराचा ऐवज प्रवाशाला केला परत; रिक्षा चालकाने निभावला प्रामाणिकपणा

नंदुरबार- रिक्षेत राहून गेलेली तब्बल 96  हजाराचा  ऐवज असलेली पर्स अवघ्या तासाभरात नंदुरबार शहर पोलिसांनी शोधून दिली त्याचप्रमाणे ती पर्स ऐवजासह प्रामाणिकपणे परत करणाऱ्या रिक्षाचालकाचा पोलीस अधीक्षकांनी सत्कार देखील केला. देवेंद्रसिंग राजूसिंग परदेशी, रा. परदेशीपुरा असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.
 रुपाली रामचंद्र धनगर, राहणार उधना, सुरत, राज्य गुजरात ह्या त्यांचे पतीसह दिनांक 21/12/2022 रोजी नंदुरबार येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या नंदुरबार बस स्थानकावर उतरल्या आणि एका रिक्षात बसून करण चौफुलीवर गेल्या. तेथे रिक्षातून उतरल्यानंतर त्यांनी रिक्षा चालकास भाड्याचे पैसे दिले. त्यानंतर सदर रिक्षा चालक तिथून निघून गेला, काही वेळातच रुपाली धनगर यांच्या लक्षात आले की, त्यांच्याजवळ असलेली त्यांची पर्स व त्यामध्ये असलेले 3000/- रुपये रोख रक्कम व 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ही रिक्षामध्येच राहिली. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या आणि त्यांच्या पतीसह तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी घडलेली हकीगत पोलीस हवालदार वसंत वसावे यांना सांगितली.
त्यानंतर शहर पोलीस ठाणेचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रतापसिंग मोहिते यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाण्या सहा. पोलीस उप निरीक्षक कृष्णा पवार, पोलीस नाईक बलविंदर ईशी, स्वप्नील शिरसाठ, पोलीस शिपाई अफसर शहा अशांना तक्रारदार यांचे पतीसोबत बस स्थानक, नंदुरबार येथील रिक्षा स्टापवर तपासकामी पाठविले. त्या ठिकाणी पोलीसांनी DSK मार्केट परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली. त्याआधारे वरील नमुद महिला व तिचे पती हे ज्या रिक्षात बसले होते ती रिक्षा पोलीसांनी निष्पन्न केली. सदर रिक्षेचा शोध घेतला असता ती रिक्षा रेल्वे स्टेशन परिसरात मिळून आली. तेव्हा रिक्षाचे चालकास पोलीसांनी प्रवासी महिलेच्या पर्सबाबत विचारणा केली असता, रिक्षा चालकाने त्यांची रिक्षात अनावधानाने राहून गेलली पर्स सांभाळून ठेवली असल्याचे पोलीसांना कळविले. त्यानंतर रिक्षा चालकाने प्रवासी महिलेची पर्स नंदुरबार शहर पोलीस ठाणेला येवून समक्ष हजर केली. त्या पसंची प्रवासी महिलेने समक्ष पाहणी केल्यावर त्यामध्ये 3000/- रुपये रोख रक्कम व 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकूण 96,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांना सुस्थितीत मिळून आला.
त्यानंतर प्रवासी महिला रुपाली धनगर यांना किंमतीचा ऐवज त्यांना सुपूर्द केला. मुद्देमाल परत मिळताच प्रवासी महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले व तिचा वरील प्रमाणे ऐवज असलेली पर्स तिला पोलीसांनी एका तासातच परत मिळवून दिल्याने तिने पोलीसांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यानंतर आज रोजी रिक्षाचालक देवेंद्रसिंग राजूसिंग परदेशी, रा. परदेशीपुरा, नंदुरबार यांच्या प्रामाणीकपणाबद्दल व नंदुरबार शहर पोलीस ठाणे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रतापसिंग मोहिते, सहा. पोलीस उप निरीक्षक कृष्णा पवार, पोलीस नाईक बलविंदर ईशी, स्वप्नील शिरसाठ, पोलीस शिपाई अफसर शहा यांनी केलेल्या कामाचे कौतुक म्हणून पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सर्वांचे पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!