‘त्या’ व्हिडिओवर विश्वास ठेवू नका: पोलिसांचे आवाहन

 

‘तो’ व्हिडिओ प्रसारित केल्यास होणार कठोर कारवाई

 

नंदुरबार- शहरातील प्रवेशद्वाराजवळ ‘लव नंदुरबार’ फलकाजवळ ध्वज फडकविण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. हा व्हिडीओ ईद-ए-मिलाद यादिवशी मोहम्मद पैगंबर साहब यांची जयंती साजरी करण्यानिमित्त ध्वज फडकविताना तयार करण्यात आला होता. परंतु काही जणांकडून सदर व्हिडिओ भारत-पाकिस्तान च्या झालेल्या क्रिकेट मॅचनंतर पाकिस्तानचा विजय झाल्यामुळे जल्लोष करण्याच्या दृष्टीने नंदुरबारात ध्वज फडकविण्याचा व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात चुकीची अफवा पसरत असून यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच अफवांना देखील बळी पडू नये, असे आवाहन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच सदरच्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यास त्यांच्यावर सायबर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने कळविण्यात येत आहे.नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता कायदा सुव्यवस्था कायम ठेवावी, असे आवाहन नंदुरबार शहर पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!