याप्रकरणी मोहसीन रफिक मक्राणी, रईस अली शेख, हमजु मोहम्मद मक्राणी, मुल्ला अल्लारखा नमुद मक्राणी, जुनेद अमीन मक्राणी, बिलाल युसुफ मक्राणी, लाला रफिक मक्राणी, मुफतलीक मुसा मक्राणी, शोएब शफि मोहम्मद मक्राणी, साजीद छोटुखॉ पिंजारी, राजु शेरू मक्राणी, युनुस शौकत मक्राणी, जाकीर शेख पूर्ण नाव माहित नाही सर्व रा. अक्कलकुवा (जि. नंदुरबार) व ईतर १० ते १५ इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे.
याविषयी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलिस नायक अमोल खवळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संसर्गजन्य / महामारी आजार प्रति का. १८९७ चे क. २ अन्वये देण्यात आलेल्या अधिकाराचा उपयोग करून आपत्ती व्यवस्थापन अधि २००५ च्या इतर सर्व समक्ष तरतुदी अन्वये अधिसुचना तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी कार्यालया कडील आदेशान्वये अधिसुनांचे सर्व उल्लंघन करणा-यावर दि. ३१/१०/२०२१ ते दि. १४/११/२०२१ पावेतो जमावबंदीचा आदेश जारी केलेला असतांना देखील विना परवानगी रॅली काढली तसेच तोंडाला मास्क न लावता नमुद आदेशाचे उल्लंघन केले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर हे करीत आहेत.