थकित घरपट्टी न भरणाऱ्यांचा पाणीपुरवठा पालिका खंडीत करणार

नंदुरबार – मालमत्ता कर म्हणजे घरपट्टी वसुली होत नसल्यामुळे थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई लवकरच अमलात आणली जाईल अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
पालिकेकडून केल्या जाणाऱ्या वसूली बाबतचा आढावा प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी नुकताच घेतला. या आर्थिक वर्षात नंदुरबार पालिकेची फक्त १५ टक्के वसुली झाली असल्याचे त्यांना निदर्शनास आले. म्हणून वसुलीला वेग देण्याच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, नंदुरबार पालिकेच्या थकीत मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण फारच कमी असल्याने मालमत्ताधारकांवर कारवाईसाठी मार्च महिन्यात धडक मोहीम राबविली जाणार आहे. शहरातील सर्वात मोठे थकबाकीदार असलेल्या ५० खातेदारांची फेब्रुवारीनंतर मालमत्ता जप्त केली जाईल तसेच पाणीपुरवठाही खंडित करण्यात येणार आहे.
 शहरात मालमत्ताधारक  १७,२२५, वाणिज्य अ १,५५९, वाणिज्य ब: २,५९०, धार्मिक : १९५, पालिका मालकीचे ६३, खुल्या जागेतील १०,१५० असे एकूण 31 हजारहून अधिक करपात्र मालमत्ताधारक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!