*दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी लॉकअपमधून पसार

नंदुरबार – दरोड्याच्या गुन्ह्यातील पहाटे अटक केलेले पाच आरोपी तिसऱ्या तासातच पोलीसठाण्यातील लाॅकअपची खिडकी तोडून पसार झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्यात घडली असून त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहेत.

 प्राप्त माहितीनुसार नवापूर तालुक्यात एका दरोड्याच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली होती त्यांना नवापूर पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते तथापि खिडकी तोडून त्यांनी पलायन केल्याचे पोलिसांना आढळून आले. नवापूर पोलीस ठाण्याची लोक अप असलेली इमारत ब्रिटिश कालीन व जुनाट आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांची वर्दळ असताना आरोपी पलायन करण्यात यशस्वी कसे काय होऊ शकले? हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.  पोलीस निरीक्षक वारे यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आज सोमवार दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी पहाटे पाच वाजे दरम्यान त्या आरोपींना अटक करण्यात आली होती आणि लोक अप मध्ये बंद करण्यात आले होते. त्यांनी पलायन केल्याचे सकाळी साडेआठ वाजे दरम्यान लक्षात  आल्यानंतर तातडीने पथक रवाना करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!