नंदुरबार :- नंदुरबार येथील व्यापारी व अक्कलकुवाचे मुळ रहिवाशी रमेशचंद गेनमल बोहरा व सौ.निर्मलाबाई रमेशचंद्र बोहरा यांची सुकन्या व नथमल खेतमल कोटडीया यांची पदवीधर नात मुमुक्षु प्रेरणा बोहरा (वय 19 वर्षे) आणि एमएससी पदवीधर मुमुक्षु स्नेहा बोहरा (वय 21 वर्षे) या दोन्ही भगिनींचा भव्य दीक्षा सोहळा बुधवार दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडणार असल्याची माहिती बोहरा परिवाराकडून देण्यात आली आहे. या माहितीत म्हटले आहे की राजस्थान राज्यातील नोखामंडी या गावी परमपुज्य ज्ञान गच्छाधिपति श्रृतधर पंडित रत्न श्री . प्रकाशचंदजी म . सा . यांच्या सानिध्यात जैन भागवती दिक्षा धारण करणार आहेत. या जैन भागवती दिक्षा मोहत्सवानिमीत्त 10 ऑक्टोबर रोजी नंदुरबार येथिल आदेश्वरनगरातील जैन स्थानकापासून अग्रवालभुवनपर्यंत शोभायात्रा काढण्यात येणाार आहे. नंतर जैन समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजता दिक्षार्थी भगीनींचा अभिनंदन समारंभ पार पडेल. या सोहळ्याचे आयोजन श्री जैन स्थानकवासी संघ आणि श्री रमेशचंद जी बोहरा परीवारातर्फे करण्यात आले आहे. तथापि हा सोहळा कोराना नियमांचे व सोशल डिस्टेन्स, मास्क वगैरे नियमांचे पालन करुन मर्यादीत उपस्थितीत होणार आहे. त्यासाठी समाज बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन अयोजकातर्फे करण्यात आले आहे.