नंदुरबार – उतारा देण्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला लाच घेणे महागात पडले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी मुलाच्या नावे पुसनद ग्रामपंचायत हद्दीत घर विकत घेतले होते. त्या घराचा नमुना 8 ‘अ’ चा उतारा मिळावा, यासाठी तक्रारदाराकडून पुसनद ग्रामपंचायत(ता. शहादा, जि. नंदुरबार) चे ग्रामसेवक उमेश निमसिंग रौंदळे, वय 35 वर्षे, रा. विनोद नगर, देवपूर धुळे यांनी २ हजार रुपयांची लाच मागितली होती. या तक्रारीची पडताळणी करून आज दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी सापळा रचण्यात आला. त्यावेळी सदर रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली म्हणून लगेचच अटक करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुुरु करण्यात आली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने (नाशिक परिक्षेत्र, नाशिक) व सतीश भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक (अति.कार्यभार) नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे धुळे येथील पोलीस उपअधीक्षक, सुनील कुराडे (अति. कार्यभार नंदुरबार.) यांनी दिलेल्या सूचनेनुसार नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक माधवी समाधान वाघ व पोलीस निरीक्षक,समाधान एम.वाघ यांनी कारवाई केली. सापळा पथकात पोलीस हवालदार उत्तम महाजन, विलास पाटील, विजय ठाकरे, पोना दिपक चित्ते, पोना अमोल मराठे, पोना देवराम गावित, मपोना ज्योती पाटील, पोना संदीप नावडेकर, जितेंद्र महाले यांचा सहभाग होता.
समाजात जागृती नागरिक वाढत आहे.माहितीपुर्ण वार्ता.