धक्कादायक ! मुलगा आणि सूने पाठोपाठ पित्यानेही केली रेल्वे खाली आत्महत्या; नवापूरची घटना

आत्महत्या केलेले नवदांपत्य

नंदुरबार – वडील, त्यांचा मुलगा आणि सून अशा तीन जणांनी एकाच वेळी रेल्वे खाली जीव दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हे मयत तिघेही नवापूर शहरातील रहिवासी असून नंदुरबार सुरत रेल्वे मार्गावरील नवापूर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर हे दुर्घटना घडली. नवापूर पोलीस ठाण्यात ही आत्महत्या असल्याचे प्राथमिक नोंद करण्यात आली असली तरी या घटाने मागचे कारण अद्याप उघड झालेले नाही.

नवापूर नगरपरिषद हद्दीतील तीनटेंबा परिसरातील सावत सैय्यद गावित वय 21, त्यांची
पत्नी रोशनी सावत गावित आणि वडील सैयद कर्मा अशी या तिघांची नावे आहेत. नवीन दुचाकी घेण्याचा वादातून सदर घटना घडली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे तथापि नेमके कारण काय याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलीस सूत्रांकडून कळालेल्या माहितीनुसार रात्री 11 वाजे च्या सुमारास सावंन सैयद गावीत वय 21 व त्याची पत्नी रोशनी या दोघांनी आत्महत्या केल्या चे समजताच वडिलांनीही रात्री 1 वाजेच्या सुमारास रेल्वे खाली आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं, सहकारी युवराज परदेशी,विकी वाघ,योगेश थोरात,प्रताप वसावे हे करीत आहेत सकाळी तिंघाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालयात नेण्यात आले.

*अभागी माता पडली एकाकी*

मजुरीतून उपजीविका करणारा गावित परिवार रेल्वे रुळापासून काही अंतरावर असलेल्या वसाहतीत राहत होता. त्यांच्या घरात वयस्कर आई-वडील आणि तरुण मुलगा व त्याची पत्नी असे चारच सदस्य होते. नवी दुचाकी घेण्यावरून बापलेकाचे भांडण झाले असे सांगण्यात येते. भांडण झाल्यावर तरुण पती-पत्नी रागात जवळच्याच रेल्वे रुळावर गेले आणि तिथे धावत्या गाडीचा फटका बसून मरण पावले. काही वेळाने बापाला ही घटना कळली म्हणून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर एक वाजता त्याच रुळावरून दुसरी गाडी धावत आली त्यावेळी बापाने ही त्याखाली जीव दिला; असा घटनाक्रम स्थानिक लोकांकडून सांगण्यात आला. घरातील एकमेव जिवंत राहिलेल्या वयस्कर आईवर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्या करणाऱ्या या नवदांपत्याचे अवघे चार-पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ही या घटनेतील मनाला चटका लावणारी बाजू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!