नंदुरबार – महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखुची होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना माहिती काढून सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते. .
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दिनांक 23/04/2023 रोजी सायंकाळी गुजरात राज्यातून नंदुरबार मार्ग अशोक लेलँड कंपनीच्या चारचाकी वाहनातून सुगंधीत तंबाखूची वाहतूक होणार आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे यांना माहिती कळवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.
मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे यांनी दिनांक 23/04/2023 रोजी धानोरा ते नंदुरबार रस्त्यावर सुंददे बस स्थानकाजवळ सापळा रचला. धानोरा ता. नंदुरबार गावाकडून नंदुरबार शहराच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी करोत असतांना धानोरा गावाकडून नंदुरबार शहराच्या दिशेने एक अशोक लेलॅण्ड कंपनीचे चारचाकी वाहन (क्रमांक MH 39 AD 1877) भरधाव वेगाने येतांना दिसून आले. पोलीस पथकातील अमंलदारांनी हाताच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा देवून वाहन थांबविले. वाहनातील इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता सचिन भगवान पाटील वय 45 वर्ष, रा. प्लॉट नं. 18 बीए शुभम पार्क, सहारा टाऊनए नंदुरबार आणि रत्नदिप वासुदेव पाटील ऊर्फ राकेश किशोर राजपुत वय 32 वर्ष, रा. शिवाजी रोड, चैतन्य चौक, दोशिया मशिद समोर, जळका बाजार, नंदुरबार असे सांगितले. उपनगर पोलीस ठाण्याच्या पथककांनी त्यास वाहनात काय भरले आहे ? याबाबत विचारपूस केली. असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला, म्हणून उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकांनी दोन्ही संशयीत व चारचाकी वाहन ताब्यात घेतले.
उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकांनी कायदेशीर प्रक्रिया करून वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्या दिसून आल्या. सदर गोण्या उघडून पाहिले असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधीत तंबाखू मिळुन आली. आरोपीतास सदरची सुगंधीत तंबाखू बाबत विचारपुस केली असता त्याने गुजरात राज्यातील निझर ता निझर जि. तापी गुजरात राज्य येथून विकत घेवुन ते विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून जात असल्याचे सांगितले.
दोन्ही संशयीत आरोपीत व एकुण 32 लाख 63 हजार 120 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला असून उपनगर पोलीस ठाणे येथे 111/2023 भा.द.वि. कलम 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (i)- 27 (3) (c) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची सुगंधीत तंबाखू ही कोणाकडून विकत आणली तसेच कोणास विकण्यास जात आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून दोषविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे, सहा. पोलीस उप निरीक्षक पानाजी वसावे, पोलीस अंमलदार विलास वसावे, विपुल पाटील, बाबुराव बागुल व होमगार्ड हेमंत राजपुत यांनी केली असून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे