नंदुरबार- धडगाव परिसरातील शेतामध्ये गांजा लागवड आढळून येण्याचे प्रमाण वाढले असून काल केलेल्या छापेमारी तीन शेतातून गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तीन शेतमालकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक यांनी संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात अमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवून त्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी देखील अमली पदार्थाची बेकायदेशीरीत्या लागवड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 21/10/2021 रोजी धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना धडगांव तालुक्यात उमराणी बारीपाडा शिवारात 2 ते 3 शेत मालकांनी ज्वारी व कापूस पिकाच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे व त्यांचे अमंलदार हे उमराणीचा बारीपाड़ा गावाजवळ असलेल्या डोंगराळ भागात पायी गेले. सरदार शंकर पावरा याच्या ज्वारीच्या शेतात आतील बाजूस ठिक ठिकाणी गांजा सदृश्य झाडांची लागवड केलेले आढळून आले. 2 लाख 2 हजार 560 रुपये किंमतीचे 1 क्विटल 1 किलो 280 ग्रॅम वजनाची एकूण 276 गांजाची झाडे आढळल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच बारीपाडा उमराणी येथील अनिल शंकर पावरा याच्या शेतातही 2 लाख 69 हजार 920 रुपये किमतीचे क्विटल 34 किलो 960 ग्रॅम वजनाची एकूण 144 गांजाची झाडे तर जयसिंग शंकर पावरा यांच्या कापुस पिकाचे शेतात 2 लाख 78 हजार 960 रुपये किंमतीचे क्विटल 39 किलो 270 ग्रॅम वजनाची एकूण 603 गांजाची झाडे मिळून आले. परंतु तो घटना स्थळावरून पळून गेला. सर्व झाडे गुन्ह्याच्या पुढील तपास कमी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेण्यात आली तसेच सरदार शंकर पावरा आणि अनिल शंकर पावरा यांना देखील ताब्यात घेऊन बेकायदेशीररीत्या गांजाच्या झाडांची लागवड केली. त्याचेविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये धडगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून एकुण 7 लाख 51 हजार रुपये किमतीचा 3 क्विटल 74 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी शहादा श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, पोलीस उप निरीक्षक राहुल भदाणे, पोलीस हवालदार जयेश गावीत, राजेंद्र जाधव, पोलीस नाईक शशिकांत वसईकर, स्वप्नील गोसावी. दिपक वारुळे, रितेश बेलेकर, गणेश मराठे, हिरालाल सोनवणे, विनोद पाटील, राजेंद्र चोरमले, अशोक पाडवी यांचे पथकाने केली असून मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.