नंदुरबार – आ.डॉ विजयकुमार गावित यांचे समर्थक मानले जाणारे तसेच जेष्ठ नेते स्व. व्यंकटराव पाटील यांचे सुपुत्र शेखर पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह पूर्व भागातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शनिमांडळचे मुन्ना पाटील यांनी डॉक्टर गावित गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे यामुळे डॉक्टर गावित यांना म्हणजे पर्यायाने भाजपाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
शिवसेनेचे जिल्हा नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, शेखर पाटील यांनी तालुक्यातील पूर्व भागातील शेकडो कार्यकर्त्यांसह आज मंगळवार (दि. 22) रोजी जाहीर प्रवेश केला. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून स्वागत केले.यावेळी कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विजय असो अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हिरालाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.शिवाजीराव मोरे,किशोर पाटील,नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक दीपक दिघे, अशोक राजपूत,धर्मेंद्र परदेशी,अंबु पाडवी आदी उपस्थित होते.
धमडाईचे ग्रा.पं सदस्य जगन्नाथ पाडवी, साईनाथ ठाकरे,विजय ठाकरे, राजेंद्र नाईक, माया ठाकरे, पिंट्या ठाकरे, रमेश ठाकरे, मोहन नाईक, दिलीप भवर,अंबालाल मराठे,सुरेश निकुंभ,रवींद्र भवर,गोविंदा निकम, मोहन भवर,दीपक आव्हाळे,राजेंद्र भवर,दिलीप भवर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला