नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यात दिनांक ०६/ १२ / २०२१ रोजी दोन ठिकाणी सोशल मीडियावर धार्मीक भावना दुखावतील व दोन जातिंमध्ये तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट प्रसारीत केलेल्या आढळल्या. त्याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणाऱ्या २ ईसमांवर २ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ही माहिती देतांना सायबर सेल आणि जिल्हा पोलीस दलाने आवाहन केले आहे की, चांगली माहिती देणारे संदेश प्रसारित करण्या ऐवजी सोशल मीडियावरुन काही लोक दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट लेख लिहून जातिय भावना भडकविण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करतांना सामाजिक भान ठेवावे व कोणतीही पोस्ट सोशल मीडियावरुन (फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्टिटर व व्हॉट्सअॅप) प्रसारीत करतांना ती पोस्ट आक्षेपार्ह आहे अगर कसे ? बाबत खात्री करावी. मगच प्रसारीत करण्याची काळजी घ्यावी. आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केल्यास त्या इसमाविरुध्द भारतीय दंड संहीता व माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० ( IT ACT २०००) प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल. याबाबत वारंवार नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी तसेच सायबर सेलने यापूर्वीही आवाहन केलेले आहे.
पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी आवाहन केले आहे की, फेसबुक, इंन्स्टाग्राम व्हॉट्सअॅप व्टिटरवर कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट दिसून आल्यास तात्काळ सायबर सेल नंदुरबार (02564-210111 Ext. 403) नियंत्रण कक्ष नंदुरबार (02564-210113 ) यावर किंवा आपल्या नजिकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधून माहीती द्यावी. धार्मिक भावना भडकविणाऱ्या दोन जातिंमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या खोट्या बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करु नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट प्रसारित करतांना कोणीही आढळुन आल्यास त्याची माहीती त्वरीत वर नमुद संपर्क क्रमांकावर किंवा नजिकच्या पोलीस ठाण्यात देण्यात यावी.