नंदुरबार – महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षा पूणे मार्फत घेण्यात आलेल्या ईयत्ता 5 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत येथील श्रॉफ हायस्कूलचा विद्यार्थी चि.आयुष किरण पाटील याने 300 पैकी २३४ गुण मिळवत नंदुरबार जिल्हयात दुसरा क्रमांक पटकावला. कोरोना कालावधित शाळा, शिक्षण यात अनेक अडथळे आले. ते सर्व पार करून आयुष याने केंद्रीय सैनिक स्कूल सातारा येथिल परीक्षाही ऊत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. सैनिक स्कूल सातारासाठी निवड झालेला नंदुरबार जिल्हयातील हा एकमेव विद्यार्थी ठरला. आयुष हा नटावद जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक किरण पाटील व जि.प.शाळा देवपूर येथील शिक्षिका श्रीमती रेखा पाटील यांचा चिरंजीव आहे. या आधी 8 वी मध्ये असतांना आयुषची बहिण कु.साक्षी किरण पाटील हिने नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. बहिणी पाठोपाठ भावाने मिळविलेले यश हे शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. आयुष याचे सनातन परीवार, श्रॉफ हायस्कूल, ज्ञानदीप सोसायटी तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर अशा विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
दरम्यान श्रॉफ हायस्कूलकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या शिष्यवृत्ती परीक्षे (२०२१)त उत्तीर्ण झालेल्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्या माहितीत म्हटले आहे की, श्रॉफ हायस्कूलमधील इयत्ता 8 वीतील कु. रेवती दिपक माळी हिने शहरी विभागातून जिल्ह्यात प्रथम व इयत्ता 5 वीतील चि. आयुष किरण पाटील याने शहरी विभागातून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच जिल्ह्यात इ. 5 वीतील 9 विद्यार्थी व इ. 8 वीतील 5 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या गुणवंतांची यादी अशी –
इयत्ता:- 5 वी
1. आयुष किरण पाटील (2)
2. समर्थ गजेंद्र चौधरी (14)
3. हिमांशू जगदीश पाटील (26)
4. दिव्या महेशकुमार चौधरी (34)
5. ओम मनोज पवार (46)
6. तन्मय रविंद्र माळी (52)
7. रिद्धेश दिपक नांद्रे (61)
8. निरज रामकृष्ण पाटील (65)
9. यश संजय बारी (74)
इयत्ता :- 8 वी
1. रेवती दिपक माळी (1)
2. स्वामी सुशिल माळी (10)
3. उन्मेष संजय बारी (12)
4. ऋषी प्रशांत सोनवणे (13)
5. सुमित अमृत पाटील (46)
शिष्यवृत्ती परीक्षा प्रमुख सुनिल शाह, मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह यांनी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.