नंदुरबारच्या लाल बंगल्यावर छापा; देहविक्री करणाऱ्यांना पकडले

नंदुरबार – शहरापासून जवळच निझर रस्त्यावरील एका बंगल्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने अचानक छापा टाकला असता देहविक्रय चालू असल्याचे आढळून आले. चार पीडित स्त्रियांची सुटका करून बंगला मालकासह अकरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अधिक वृत्त असे की, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नंदुरबार ते निझर रोड दरम्यान असणा-या लाल/त्रिकोणी बंगल्यामध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना मिळाली. त्याअन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील व उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संजोग बच्छाव यांचेसह स्टाफ अशांनी नंदुरबार निझर रोडवरील कल्याणी रेसिडेन्सीचे पुढे काही अंतरावर असलेल्या लाल/त्रिकोणी बंगल्याजवळ गेले असता तेथे बंगला क्रमांक 2 मध्ये काही संशयित हालचाली दिसल्याने तेथे रात्रीचे सुमारास छापा टाकला असता  बंगल्यात देहविक्री व्यवसाय चालू असल्याचे आढळून आले. छापा टाकणाऱ्या पथकाला त्याप्रसंगी स्वतः बंगला मालक संजय ब्रिजलाल चौधरी, वय- 49, रा.प्लॉट नं. 43, जय समाधी नगर, नंदुरबार त्यांचेसह ग्राहक, धर्मेश वसंतभाई वसावा, वय- 25 वर्षे, रा. उमरपाडा देवरुपम जि. सुरत, विपूल जयंतीभाई वसावा, वय- 27 वर्षे, रा. सागबारा, जि. नर्मदा गुजरात, हर्षेद कांतीलाल पाटील, वय 30 वर्षे, रा.लोणखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार , अशोक सुदाम पाटील, वय- 42 वर्षे, रा. लोणखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार, अनमोल कुवरसिंग वसावा, वय- 29 वर्षे, रा.सागबारा, ता.नलगाव, जि. नर्मदा, गुजरात , राहुल केशव गामित, वय 34 वर्षे, रा. सिंगपुर, ता. सोनगड, जि. तापी, गुजरात , आशिष हिरालाल वसावा, वय- 27 वर्षे, रा. मोठी देवरुपण ता.उमरपाडा, जि. सुरत, हर्षेद विश्वनाथ गावित, वय- 26 वर्षे, रा. वडगाव, ता. उमरपाडा, जि. सुरत , नितेश धिरसिंग वसावा, वय- 21 वर्षे, रा.वडगाव, ता.उमरपाडा, जि. सुरत , अर्जुन दिनेश वसावा, वय 21 वर्षे, रा. वडगाव, ता.उमरपाडा, जि. सुरत असे 11 जण मिळुन आले. तसेच एकुण 4 पिडीत महिला मिळुन आल्या. 5,650/- रुपये किमतीचा दारु, गुटखा व इत्यादी मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. या प्रकरणी संजय ब्रिजलाल चौधरी यांच्यावर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधि. 1956 चे कलम 3, 4, 5, 7(2) (a) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (4) (5), 27(b) (e) व महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (इ) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.श्री. संजोग बच्छाव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संजोग बच्छाव, पोउपनि-श्री. अमोल देशमुख, श्रे. पोउपनि श्री. रविंद्र पवार, तसेच स्था.गु.शा. व उपनगर पोलीस ठाण्याचे पुरुष व महिला स्टाफ अशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!