नंदुरबार: चक्रीवादळाचा फटका; धावत्या कारवार झाड कोसळून एकाचा मृत्यू, 35 शेळ्याही दगावल्या

नंदुरबार – गुजरात राज्यातील चक्रीवादळ घरांची, शेत पकाची प्रचंड नासधूस करीत नंदुरबार जिल्ह्यात येऊन थडकले. त्यामुळे नंदुरबार तळोदा अक्कलकुवा शहादा या तालुक्यांमध्ये विद्युत खांब आणि अनेक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, या वादळी पावसात तळोदा तालुक्यात 30 हून अधिक शेळ्या मरण पावल्या. तर, विद्युत तारांचे घर्षण होऊन झाडांनी पेट घेतल्याची घटना नंदुरबार शहरात घडली.
आज दि.४ मे रोजी सकाळी १० वाजता अचानक वादळी वाऱ्याने रौद्र रुप धारण केले.त्यात तळोदा तालुक्यातील तळोदा-चिनोदा रस्त्यावर वडाचे झाड गाडीवर कोसळून एकचा जागीच मृत्यू झाला. प्रतातपुर ता. तळोदा येथील राजेंद्र रोहिदास मराठे (वय- ४२ ) असे मृत इसमाचे नाव आहे (जी.जे. -06 जी. ई-0541) आर्टीगा या स्वतःच्या कारने ते जात असताना त्यांच्या कारवर झाड कोसळल्याने गाडीचा वरचा पत्रा फाटला व या अपघातात राजेंद्र मराठे यांचा जागीच मृत्यू झालाझाला.

हवामान अंदाज खरा ठरला

गुजरात मध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे व वादळी वारे व हलका पाऊस पुढील तीन तासात पडण्याची शक्यता आहे, असा इशारा सकाळीच नंदुरबार येथील डॉक्टर हेडगेवार सेवा समितीच्या कृषी विज्ञान केंद्रातील जिल्हा कृषि हवामान केंद्राने दिला होता. दुर्दैवाने हा अंदाज खरा ठरला आणि वादळ वाऱ्याच्या माध्यमातून नासधूस झाली.

 

दरम्यान आज  दि.४ मे रोजी प्रारंभी 11 ते 12 वाजे दरम्यान नंदुरबार जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात चक्रीवादळाचा फटका बसला. अशातच विजांचा प्रचंड कडकडाट करीत कुठे मुसळधार तर कुठे बारीक सरी कोसळल्या. शहादा तालुक्यातील अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडून जाणे कौलारू छत कोसळणे अशा घटना घडल्या. अक्कलकुवा खापर रस्त्यावर लहान मोठे वृक्ष कोसळलेले दिसले.  तळोदा तालुक्यात देखील झोपड्या उडून जाणे पत्रे उडून जाणे अशा घटना घडल्या. नंदुरबार तालुक्यात काही ठिकाणी याच प्रकारचे नुकसान झाले एका कापूस गोदामाचे या वादळामुळे मोठे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!