नाशिक – कायदा सुव्यवस्था अबाध ठेवतांनाच दाखल गुन्ह्यांची उकल करण्यातही परिक्षेत्राच्या पोलीसदलाने विशेष कौशल्य सिद्ध केले आणि अवैध शस्त्रसाठा जप्त करणे, महत्त्वाचे गुन्हेगार पकडणे तसेच कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांवर वचक बसवणे अशी चांगली कामगिरी करून दाखविल्या बद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला उपमहानिरीक्षक यांनी सन्मानित करून विशेष कौतुकाची थाप दिली.
पोलीस उपमहानिरिक्षक पी.जी. शेखर पाटील यांनी उकल झालेल्या क्लिष्ट प्रकरणाच्या तपासावर आणि नंदूरबार पोलीसांच्या कर्तृत्वावर शाबासकीची थाप देण्यासाठी आयोजित छोटेखानी समारंभ प्रसंगी ही शाबासकी वणी येथील आणि नंदूरबार येथील पोलीसांसाठी नाही तर एकूण परिक्षेत्रातील पोलीसांच्या कर्तृत्वाचा प्रातिनिधीक सन्मान असल्याच्या भावना व्यक्त झाल्या.
वणी येथील घटनेचा संदर्भ असा की, बुधवार दि. २७ आक्टोबरच्या रात्री साधारण १२.३०-१२.०० वा. दरम्यान वणी बस स्टँण्डवर एका महिलेवर सामुहिक बलात्काराचा दुदैवी प्रकार घडला होता. ही बाब निदर्शनास येताच वणी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहा.पोलिस निरिक्षक स्वप्निल राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रणनिती तयार करून संशयीतांचा माग काढला. अवघ्या तीन तासात या विकृत संशयीतांच्या मुसक्या बांधण्यात राजपूत आणि कंपनीला यश आले या गुन्ह्याची वार्ता कळताच उपमहानिरिक्षक बी.जी.शेखर आणि पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी सातत्याने वणी पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहून संशयीतांचा छडा लावण्यात मार्गदर्शन केले. पोलीस अधिक्षकांनी तर पहाटेपासूनच पोलीस ठाण्यात तळ ठोकला होता.
त्याचबरोबर नंदूरबार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनीही एका खुनाच्या गुन्ह्यात आपले कौशल्य पणाला लावून अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेले गुन्हे उघडकीस आणून संशयीतांच्या नाड्या आवळल्या. पोलिस अधिक्कष पी.आर. पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे या गुन्ह्याची उकल झाल्याचे कळमकर सांगतात. सहा पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूतांच्या पथकातील उपनिरिक्षक रतन पगार, पो हवा. एच.के. चव्हाण, पो.ना. सी. एम. बागूल ए.एम. डो. बच्छाव, एस. जे. ठाकरे, व्ही. एस. खांडवी तर नंदूरबार एलासीबीचे पो. नि. रविंद्र कळमकर यांच्या पथकातील ठाणे अमलदार अनिल गोसावी, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पो.ना.मोहन ढमढेरे, किरण मोरे, अभय राजपूत, यशोदीप ओगळे यांना नाशिक परिक्षेत्र मुख्यालयात बोलावून उपमहानिरिक्षक शेखर पाटील यांनी त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली. या छोटेखानी सत्कार सोहळ्यासाठी पाचही जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक तसेच अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी आवर्जून उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यावर म्हणाले की, उप महानिरिक्षकांनी परिक्षेत्राचा प्रभार घेतल्यापासून पाचही जिल्ह्यात अवैध पदे आणि माफियागीरी, गुंडगिरीविरुद विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नाशिक विभागात जाणवू लागला आहे. या सत्कार सोहाळ्यामुळे परिक्षेत्र पोलीस दलाच्या कार्यक्षमतेला आणखी नवी उर्जा मिळणार असून आमची कामगिरी अजून आणखी चमकदार होताना दिसेल.
एकंदरीतच दलाचा प्रधान धोरणी आणि चाणाक्ष असेल, सेनापती धाडसी आणि चौकस असेल तर सैन्य खिंड लढवून विजयश्री खेचून आणते. तसे घडताना दिसत असल्याचे मत व्यक्त होत आहे.