नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार तथा पहिले इतिहासकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

नंदुरबार – महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक पहिले मराठी वृत्तपत्रकार थोर इतिहास संशोधक ज्ञानेश्वरीचे पहिले प्रकाशक व आद्य प्रवर्तक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करीत नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकारितेवर मंथन करण्यात आले तसेच उत्तम कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

ऑल इंडिया न्यूज पेपर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यभान राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पत्रकारांनी पत्रकारिता करीत असतांना आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ३६५ दिवस समाजासाठी काम करीत नेहमी झटत असतात. तथापि पत्रकारांनी आत्ममंथन करायला पाहिजे की, समाजाप्रती आपण किती उतराई झालो आहोत.  समाजानेही भान ठेवत पत्रकारांची कदर करावी ही अपेक्षा निश्चितच स्पृहणीय आहे. असे प्रतिपादन याप्रसंगी सूर्यभान राजपूत यांनी केले.

आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्ड वितरण

राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्डचे वितरण वितरण करण्यात आले. हेल्थ कार्ड हे डिजिटल स्वरूपाचे असून, ज्यामध्ये सर्व वैद्यकीय अहवाल संकलित करता येऊ शकतो.रुग्ण आजारी पडल्यास निदान कोणत्या डॉक्टरांकडे झाले, कोणत्या तपासण्या करायच्या आदी सर्व प्रकारची माहिती या कार्डमधे असणार आहे. कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना कार्डचे वितरण करण्यात आले.

पत्रकार भवनाच्या सुशोभीकरणासाठी देणगी

नेहरू नगरातील पत्रकार भवनाच्या सुशोभीकरणासाठी उद्योजक नितेश अग्रवाल यांनी १ लाख ११ हजार रुपयांची देणगी कार्यक्रमाप्रसंगी जाहीर केली. त्यांचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पुरस्कार प्राप्त रणजित राजपूत,मनोज शेलार,भिकेश पाटील व राजेंद्र पवार यांच्या शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी यांनी केले. व्यासपीठावर पत्रकार मनोज शेलार, उद्योजक नितेश अग्रवाल,विशाल माळी, भिकेश पाटील,बाबासाहेब राजपूत,रमेश महाजन,जगदीश सोनवणे,देवेंद्र बोरसे,अविनाश भामरे,धर्मेंद्र पाटील,सतीश गोसावी,राजू पाटील उपस्थित होते.

प्रसंगी गौतम बैसाने,किसन जाधव,सुनील कुलकर्णी,गजेंद्रसिंग राजपूत,दिलीप बडगुजर,जगदीश ठाकूर,जितेंद्र जाधव,ज्ञानेश्वर माळी,दिनू गावित,ज्ञानेश्वर गवले,दीपक सोनार,किशोर गवळी,आसिफ मिर्झा,उमेश पांढारकर,प्रशांत जव्हेरी,जीवन माळी,नितीन पाटील,सूर्यकांत खैरनार, सुनिल कुलकर्णी, निलेश चौधरी,महादू हिरणवाळे,कल्पेश मोरे,शैलेश चौधरी,महेंद्र चौधरी,महेंद्र चित्ते,वीरेंद्र राजपूत, किसन जाधव, सुबोध अहिरे, प्रेमचंद राजपूत, चिराउद्दीन शाह आदी उपस्थित होते.आभार प्रदर्शन रमेश महाजन तर सूत्रसंचलन रणजित राजपूत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!