नंदुरबार : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारद्वारा सन 2021-2022 या वर्षांसाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार तसेच, सन 2018 व 2020 या दोन वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, गौरवपत्र व दहा हजार रुपये रोख स्वरुपात देण्यात येणार आहे.
सन 2021-2020 वर्षांसाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार म्हणून श्रीराम अरुण मोडक तर गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष ) म्हणून परिक्षित प्रगतीचंद्र बोरसे ,गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला) हर्षदा शिवदा पाडवी तर गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कार म्हणून कालीदास वरतु वसावे यांना देण्यात येणार आहे. सदर पुरस्कार कोविड नियमान्वये नंतर प्रदान करण्यात येणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारद्वारा जिल्हा युवा पुरस्काराचे स्वरुप युवक व युवती यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र व दहा हजार रुपये रोख स्वरुपात तसेच युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेस सन्मानचिन्ह, गौरवपत्र व 50 हजार या प्रमाणे देण्यात येणार आहे.
सन 2018 वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवक) जगदीश सुरेश वंजारी तर जिल्हा युवा पुरस्कार (युवती ) साठी कु.रोमाना इम्रान पिंजारी, यांना तर जिल्हा युवा पुरस्कार (संस्था ) म्हणून नंदुरबार तालुका विधायक समिती, नंदुरबार या संस्थेस देण्यात येणार आहे.
सन 2020 वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार (युवक ) ऋषिकेश भालचंद्र मंडलिक यांना तर जिल्हा युवा पुरस्कार (युवती) साठी कु.पल्लवी रविंद्र प्रकाशकर यांना देण्यात येणार आहे. 2020 साठी जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) तसेच सन 2019 या वर्षांत जिल्हा युवा पुरस्कार युवक व युवती तसेच जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) साठी एकही पुरस्कारासाठी पात्र नसल्यामुळे यावर्षांचा पुरस्कार निंरक समजण्यात यावा. सदर पुरस्कार कोविड नियमान्वये नंतर प्रदान करण्यात येणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.