पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://fb.watch/9w9juJXVJg/
नंदुरबार : कोरोना वैश्विक महामारी प्रसंगी झालेले मृत्यू महाराष्ट्रातील आघाडी सरकार लपवत आहे. एकट्या नंदुरबार जिल्ह्यात दर दिवशी 22 मृत्यू आणि एकूण 12000 मृत्यू कोरोना मुळे झालेले असताना शासकीय रेकॉर्डवर केवळ 984 दाखविले जात आहेत; असा गौप्यस्फोट करतानाच भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी कोरोना काळात महाराष्ट्र सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप केला. त्याच बरोबर आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारने दिलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या निधीचा हिशोब राज्य सरकारने द्यावा; असेही आवाहन केले. मुंबईत दि.25 नोव्हेंबर2021 रोजी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना त्या बोलत होत्या.
याप्रसंगी भाजपाचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलतांना खासदार डॉ.हीना गावीत यांनी माहिती दिली की, केंद्र सरकारकडून गरीब मजूर आदिवासी आणि अन्य दुर्लक्षित घटक यांना मोफत अन्नधान्य वाटपासाठी चार हजार 592 कोटी रुपयांची मदत दिली. आकांक्षी जिल्हा म्हणून 3000 रेमडीसीवर इंजेक्शन येथे मोफत दिले. पण ते गरिबांना मिळाले नाही. केंद्र सरकारने स्थलांतरित आणि मजुरांसाठी 243 कोटी रुपये दिले. केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला होता. परंतु काहींकडून मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची जोरदार स्पर्धाच सुरु होती. नंदुरबार जिल्ह्यात आम्ही हे पाहिले, असे डॉक्टर गावित म्हणाल्या.
त्यांनी पुढे सांगितले की, राज्याच्या ढिसाळ कारभारामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यु, सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वाधिक संसर्गदर आणि सर्वाधिक लुबाडणूक झाली व हजारो लोकांना नाहक प्राण गमवावे लागले याचे जिवंत उदाहरन नंदुरबार जिल्हा आहे. राज्यात काळाबाजार, ऑक्सिजनचा तुटवडा, लस वाटपातील वशिलेबाजी व साठेबाजी, दर्जेदार आरोग्य सुविधांचा अभाव हे सर्व सुरुच होत आणि सरकार मात्र शांत होत.
काही अधिकाऱ्यांनी मनमानी करीत रेमेडीसीवीरच्या काळाबाजारात साथ दिली. जिल्ह्यात ऑक्सिजन तुटवडा असतांना देखील जिल्ह्यात ऑक्सिजन भरपुर असल्याचे भासवून जनतेची दिशाभुल केली गेली आणि म्हणुन बाहेरुन येणारी ऑक्सिजन ची मदत सुध्दा थांबली. या मुळे अनेक गरजु रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकला नाही आणि मृत्युचे प्रमाण वाढले अशा अधिकाऱ्यांना राज्य सरकारने पाठीशी घातले.
हजारो लोकांच्या मृत्युसाठी जबाबदार असलेल्या व काळाबाजारास साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर हे सरकार कारवाई करणार का? असा माझा या ठाकरे सरकारला प्रश्न आहे. आपत्ती निवारण निधीतील केंद्राने दिलेल्या दोन हजार कोटींच्या निधीतून कोणत्या उपाययोजना केल्या, याचा हिशेब राज्य शासनाने जनतेस द्यावा, असे आव्हानही खासदार डॉ.हिना गावीत यांनी दिले.
https://fb.watch/9v1he-cj0g/