नंदुरबार – शहरातील दादा गणपती जवळील एका दुमजली इमारतीला अचानक आग लागल्यामुळे लोकांची धावपळ उडाली. घरोघर लक्ष्मीपूजन चालू असताना आणि पूजाविधीमध्ये प्रत्येक घरातील व्यक्ती व्यस्त असताना ही घटना घडली. त्यामुळे आग लक्ष आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत इमारतीचा लाकडी भाग बराचसा जळून खाक झाला. परंतु नगरपालिकेचा अग्नी शमनबंब वेळेवर दाखल झाला व आग आटोक्यात आणली गेली. जुनाट लाकडी बांधकामातील इमारती जवळ असल्यामुळे आग पसरण्याचा धोका होता. अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळेत उपस्थित झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कीर्ती भाई शहा व भालेराव शहा यांच्या मालकीची ईमारत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दिवाळीचे फटाके उडवले जात असल्यामुळे ही आग लागल्याची चर्चा होती तथापि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. ही बातमी लिहीपर्यंत पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.