नंदुरबार नगरपालिका सभेत करवाढ नसलेल्या अर्थसंकल्पाला मंजूरी

नंदुरबार –  नंदुरबार नगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आज शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोणतीही करवाढ नसलेल्या 108 कोटी रुपयांच्या नंदुरबार नगरपालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

नंदुरबार नगर पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. शहरातील विविध 18 विषयांनाही मंजुरी देण्यात आली. प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात लेखाधिकारी वैशाली जगताप हेही उपस्थित होते. दरम्यान सभेत विरोधी पक्ष नेते भाजपा नगरसेवक चारुदत्त कळवणकर, प्रशांत चौधरी, गौरव चौधरी यांनी विषयांवर आक्षेप घेतला. त्यावेळी रेल्वे बोगद्याच्या निधीवरून शाब्दिक चकमक उडाली.

नंदुरबार नगरपालिकेचे सन 2022-23 या वित्तीय वर्षाचे अंदाजपत्रक 108 कोटी 9 लाख 86 हजार 686 रुपये असून 32 कोटी 6 लाख 86 हजार रुपये शिलकी अर्थसंकल्प आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत रजा मागणी कामी आलेल्या अर्जावर मंजुरी देण्यात आली तसेच वित्तीय वर्षात जमाखर्चाचा अर्थसंकल्प स्थायी समितीने शिफारस करून मंजुरीकरिता सादर केला याचबरोबर आदेश्वर नगर पाण्याची टाकी चा वरील भाग वजिना दुरुस्ती कामे मंजुरी देण्यात आली सर्वे नंबर 397 चे क्षेत्र शेती विभागातून वरून रहिवास विभागात समाविष्ट करणे कामी मंजुरी देण्यात आली नंदुरबार शहर विकास आराखड्यात सर्वे नंबर 426 चे कब्रस्तान या प्रयोजनासाठी असलेले क्षेत्र आरक्षणातून वगळून शैक्षणिक प्रयोजनासाठी आरक्षित करण्यात आले स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत नंदुरबार शहरात पंचतारांकित नामांकन मिळणे बाबत तसेच सर्वे नंबर 41 शेती विभागात असलेले क्षेत्र वगळून रहिवास भागात मंजुरी देणे शहरातील धुळे चौफुली गवळी गवळी समाज या स्मशानभूमी चा सभोवताली संरक्षण भिंत बांधणे कामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली याचबरोबर नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामे करण्यासाठी शासनाच्या जिल्हा स्तरावर जिल्हा नियोजन समिती मधून निधी मागणी करणे कामी मंजुरी देण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन मतलाल माळी यांनी केले. आयोजन दीपक पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!