नंदुरबार – नाशिक परीक्षेत्र पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पंधरवाड्याचे आयोजन करीत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने विविध उपक्रम घेऊन जनजागृती केली.
दिनांक 1 जुलै 2022 ते दिनांक 15 जुलै 2022 असे पंधरा दिवस चाललेल्या या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पंधरवाड्यात शाळा, महाविद्यालयात स्पर्धा, रैली, भाषण स्पर्धा, पथनाटय इत्यादी कार्यक्रमांचा समावेश होता. त्याचप्रमाणे पाल्य व पालक यांचे एकत्रित चर्चासत्र, संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक 15 जुलै 2022 रोजी पंधरवाड्याची सांगता म्हणून नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथे पथनाट्य व सामूहिक शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मार्गदर्शनपर भाषणात नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यानी अमली पदार्थाचे सेवन केल्याने त्याचे स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम व वाढत चाललेली गुन्हेगारी सांगत, आजच्या तरुणाईने व्यसनापासून लांब राहावे; असे आवाहन केले. तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथ दिल्ली, पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताचे वादन करुन कार्यक्रमाची सांगता केली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीर येथून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला स्वतः जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील उपस्थित राहिले. सदर कार्यक्रमास नंदुरबार जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री, नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, नंदुरबार नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नंदुरबार जिल्ह्याचे शल्य चिकीत्सक श्री चारुदत्त शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, यांचेसह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.