नंदुरबार शहर पोलिसांची धडक कारवाई; जगतापवाडीत वाहनांसह पकडला 45 लाखाचा मद्यसाठा

नंदुरबार – नंदुरबार शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे शहरातील मध्यवर्ती भागात जगतापवाडीतून शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने १८ लाख ७० हजार रुपये किमतीच्या मद्यसह एकूण ४५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जगतापवाडी सारख्या वर्दळीच्या भागातून एवढा मोठा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आल्यामुळे अनेकांना धक्का बसला.

प्राप्त माहितीनुसार गुजरात राज्यात दारूबंदी असतानाही महाराष्ट्राच्या सीमा वरती भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून मध्य प्रदेश हरियाणा व गोवा राज्यातील दारूची गुजरात राज्यात तस्करी होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना प्राप्त झाल्याच्या या अनुषंगाने त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले होते या आदेशाच्या अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर हे स्वतः त्यांच्या दोन वेगवेगळ्या पथकासह शहरातील जगतापवाडी परिसरात रस्त्यावर सापळा रचत त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची बारकाईने तपासणी केली या तपासणीत एका महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम एच ३९ सी ७३०६ या वाहनाची तपासणी केली असता यात वाहनातून १४,४०,७६८ रुपये किंमतीचे रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की चे २५६ खोके ६,००,००० रुपये किंमतीचे पिकअप वाहन असा एकूण २०,४०,७६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार जगतापवाडी परिसरात मुकेश चौधरी यांच्या घरासमोर उभ्या इनोव्हा वाहनांची तपासणी केली असता त्या वाहनातून ४,३०,०८० रुपये किंमतीचे माल्ट व्हिस्कीचे ८० खोके आणि २१,००,००० किंमतीची इनोव्हा वाहन असा एकूण २५,३०,०८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाईत १८ लाख ७० हजार रुपये किमतीचा अवैध विदेशी मद्यसाठा व २७ लाख रुपये किमतीचे दोन चार चाकी वाहन असा एकूण ४५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई 108 प्रमाणे मुकेश अर्जुन चौधरी वय ३३ वर्ष राहणार म्हसावद शिवाजी बाबुलाल चौधरी वय २९ वर्ष राहणार नंदुरबार आणि पळून गेलेला एक इसम अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला सदाची कारवाई पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ पोलिस हवालदार जगदीश पवार राजेश येलवे दीपक गोरे पोलीस नाईक भटू धनगर बलविंदर स्वप्निल पगारे नरेंद्र चौधरी पोलीस अंमलदार किरण मोरे इमरान खाटीक राहुल पांढारकर अनिल बडे युवराज राठोड यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!