नराधमांना सहाय्य करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा; विजय चौधरी यांचे गृहमंत्र्यांना निवेदन

नंदुरबार – विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपींना सहकार्य करण्याची भूमिका घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व खोटा शवविच्छेदन अहवाल देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी महत्वपूर्ण मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे केली आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील खडकी येथे आपल्या विवाहित मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची योग्य चौकशी होत नाही म्हणून पित्याने तिचा मृतदेह तब्बल 42 दिवस मिठामध्ये काढून ठेवल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. त्या महिलेला मानसिक त्रास देत चार जणांनी शारीरिक अत्याचार केल्याची खळबळ जनक माहिती देखील समोर आली आहे. या संदर्भाने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन माहिती घेतली व या प्रकरणी कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्या मुलीचे वडील अत्तर सिंग यांना दिले. त्यानंतर लागली त्वरेने विजय भाऊ चौधरी यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना तातडीने निवेदन पाठवून दखल घेण्याची तसेच कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. या निवेदनात विजय भाऊ चौधरी यांनी म्हटले आहे की, मयत मुलीचे वडील अत्तर सिंग यांनी जळगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत स्पष्ट म्हटले आहे की आरोपी रंजीत ठाकरे आणि त्याचे सहकारी यांनी माझ्या मुलीला चुकीच्या व वाईट हेतूने पळवून नेत अत्याचार करण्यात आले. , परंतु निरीक्षक अवताडे यांनी आर्थिक लाभाच्या आमिषाने संशयित आरोपींना सहाय्य करण्याची भूमिका घेत सामान्य कलम लावले. मुलीच्या पित्याने असेही म्हटले आहे की त्या मुलीने एक ऑडिओ क्लिप व्हायरल करून माहिती दिली होती आपल्यावर सिनेस्टाईल अत्याचार करून मारहाण करण्यात आल्याचे तिने त्यात स्पष्ट केले आहे. असे असताना निरीक्षक औताडे आणि सहाय्यक निरीक्षक महाजन यांनी कलम 302 आणि कलम 376 लावले नाही तसेच धडगाव ग्रामीण रुग्णालयाचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी चुकीचा खोटा शवविच्छेदन अहवाल दिला. यामुळेच तब्बल 42 दिवस वस्तुनिष्ठ योग्य तपास न होता आरोपी निष्पन्न व्हायला व अत्याचार करून खून केल्याचे सत्य बाहेर येण्यास विलंब होत राहिला. याविषयीची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली तेव्हा मुलीच्या वडिलांना धमकावण्याचे पाप देखील या अधिकाऱ्यांनी केले. म्हणून नराधमांना सहाय्य करणारे धडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक औताडे आणि सहाय्यक निरीक्षक महाजन यांना तातडीने निलंबित करावे व खोटा शवविच्छेदन अहवाल देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करून कडक कारवाई करण्यात यावी, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जावी तसेच पीडितेच्या परिवाराला सरकारच्या वतीने आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी महत्वपूर्ण मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!