नंदुरबार – येथील जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत, नव्याने आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम व 15 वा वित्त आयोग अंतर्गत जि.प.स्तर विकास आराखडा तयार करणेकामी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेस उपाध्यक्ष राम रघुवंशी, महिला बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील व विषय तज्ञ, समिती मध्ये निवड करण्यात आलेले जिल्हा परिषद सदस्य, सरपंच,पदाधिकारी व अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत अध्यक्षा वळवी,मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे,अति. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील,तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रविण प्रशिक्षक दिनेश पाटील यांनी ग्रामपंचायत विकास आराखडा,पंचायत समिती विकास आराखडा,व जिल्हा परिषद आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.