नागसेन पेंढारकर ‘बेस्ट प्रेसिडेंट गोल्ड अवॉर्ड’ने सन्मानीत

नंदुरबार – रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा येथे रोटरीच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘रोटरी क्लब ऑफ नंदनगरी’ ला 13 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

रोटरी डिस्ट्रीक्ट 3060 च्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात नंदुरबार येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरी ला 2020-21 या वर्षाचा बेस्ट क्लब गोल्ड अवार्ड या पुरस्काराने तर 2020-21 या वर्षाचे प्रेसिडेंट नागसेन पेंढारकर यांना बेस्ट प्रेसिडेंट गोल्ड अवार्ड या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यासोबतच 2020-21 या वर्षासाठी विविध 11 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नागसेन यांनी कोरोना महामारीच्याच्या काळात पथनाट्यातून ‘लसीकरण जनजागृती’ करणारा प्रोजेक्ट राबवला होता. त्याला ‘आयकॉनिक पब्लिक इमेज प्रोजेक्ट’ म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच रोटरी पब्लिक इमेज गोल्ड अवॉर्ड, HUMF प्रोजेक्ट गोल्ड अवॉर्ड, सर्विस प्रोजेक्ट सिल्वर अवॉर्ड, प्रवास सफर शिक्षा का पब्लिक इमेज अवॉर्ड, नेशन बिल्डर अवॉर्ड, कमुनिटी सर्विस प्रोजेक्ट अवॉर्ड, टीचर ट्रेनिंग प्रोजेक्ट अवॉर्ड, अन्नपूर्णा डे प्रोजेक्ट अवॉर्ड, गव्हर्नर सायटेशन अवॉर्ड, सक्सेसफुल रीचींग द पिनॅकल अवॉर्ड  हे पुरस्कारही देण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीने रक्तदान शिबिर घेणे, मास्क व सॅनिटायझर वाटणे, तसेच जवळपास 500 शिक्षकांना ऑनलाईन ट्रेनिंग देणे आदी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले होते. या उपक्रमाची दखल रोटरी डिस्ट्रिक्ट 3060 ने घेतली. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रोटरी इंटरनॅशनल चे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी, हिता जानी, डिस्ट्रिक गव्हर्नर संतोष प्रधान, डिस्टिक गव्हर्नर नेक्स्ट श्रीकांत इंदानी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट निहिर दवे, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिश शाह, पिंकीबेन पटेल, मेबरशीप चेअरमन अमरजितसिंग बुनेट, शमीम रिझवी, चिराग त्रिवेदी आदी उपस्थित होते.

हे पुरस्कार रोटरी क्लब ऑफ नंदननगरी नंदुरबार चे 2020-21 चे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, 2019-20 चे अध्यक्ष प्रितिष बांगड, लिटरसी चेअरमन सैय्यद इसरार अली आदींनी मान्यवरांचा हस्ते स्वीकारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!