नंदुरबार – नाभिक समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढले असून कमिटी गठीत करून समाजातील घटस्फोट रोखण्याचे उपाय आणि मार्ग काढले जावे, असा ठराव महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ अंतर्गत नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेच्या त्रेमासिक सभेत सर्वानुमते पास करण्यात आला. त्यानुसार कमिटी गठित केली असल्याने समाज बांधवांनी संस्थेकडे संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ अंतर्गत,नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेची त्रेमासिक सभा राजीव गांधी सभागृहात पार पडली. त्यावेळेस नूतन महीला कार्यकारिणीच्या (महिला मंडळाच्या) महिला जिल्हाध्यक्ष जयश्रीताई सुधीर निकम, महिला सचिव शशिकला सोनवणे, महिला कोषाध्यक्ष अनिता वाघ, नवापूर महिला तालुका अध्यक्ष सुनीता बीरारे यांचा सत्कार करण्यात आला.
आगामी कार्यक्रमात समाज भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे त्यासाठी योग्य नाव समाज भूषणचे नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आले. संस्थेचे ॲप व संस्थेची वेबसाईट तयार करण्याचे काम देखील लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संस्थेचे संचालक श्री नितीन मंडलिक यांनी दिली. आगामी कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. तसेच संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त रक्तदान केलेल्या समाज बांधवांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप कार्यक्रमात करण्यात येईल. अशा प्रकारचे विविध ठराव पास करण्यात आले. सभेसाठी संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे, सचिव अरवींद निकम, सहसचिव शिवाजी मिस्तरी ,कोषाध्यक्ष छगन भदाणे उपाध्यक्ष हिमांशू बोरसे,उपाध्यक्ष गजेंद्र जाधव संचालक विजय सैंदाणे विजय सोनवणे नितीन मंडलिक सुधीर निकम अनिल भदाने, शशिकला सोनवणे संस्थेचे सल्लागार श्री पी टी सोनवणे, प्रभाकर चित्ते, प्रकाश देवरे, आजीवन सभासद मयूर सूर्यवंशी, ओंकार शिरसाट, छगन सूर्यवंशी, अनिता सूर्यवंशी, नरेंद्र महाले, राजाराम निकम, लक्ष्मीकांत निकम,केतन निकम नंदुरबार तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिरसाट उपाध्यक्ष भाईदास बोरसे,शहादा शहराध्यक्ष प्रदीप सोनवणे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष जितेंद्र हिरे , नवापुर तालुका अध्यक्ष संजय शिंदे , प्राध्यापक डॉक्टर संजय महाले ,चिंतामण महाले,प्रभाकर बोरसे, पुंडलिक पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, सचिन महाले, नंदा शिरसाट, लता पवार, कल्पना सोनवणे,मनीषा निकम माजी कोषाध्यक्ष मीनाक्षी भदाने महिला जिल्हाध्यक्ष,मनीषा भदाणे. बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.