याबाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरााात यांनी दिलेल्या माहितीत म्हटलेे आहे की, आज दिनांक 05/02/2022 वार शनिवार रोजी तहसिल कार्यालय, नंदुरबार अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष श्री. देवमन तेजमल पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत तहसिल कार्यालय नंदुरबार कडे महा-ई-सेवा केंद्रामार्फत प्राप्त झालेल्या अर्जाची शासन निर्णयानुसार पडताळणी करण्यात येवून त्यावर निकषानुसार पात्र, अपात्र व पुर्ततेसाठी निर्णय घेण्यात आला. योजनानिहाय प्रकरणांची माहिती अशी- संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 199, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे 251, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे 199, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे 122 तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजनेचे फक्त 2 असे एकूण 773 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 523 अर्ज मंजूर करण्यात आले. 110 नामंजूर करण्यात आले व यातील 140 प्रकरणांची पूर्तता करण्यात आली.
निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत 577 प्रकरणांची पडताळणी करीत 523 मंजूर
नंदुरबार – नंदुरबार तहसील कार्यालयात पार पडलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत 577 प्रकरणांची पडताळणी करीत 523 मंजूर करण्यात आले.
समिती बैठकीचे प्रास्ताविक भाऊसाहेब थोरात तहसिलदार, नंदुरबार तथा सदस्य सचिव संगायो समिती यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. नितीन पाटील नायब तहसिलदार, संगायो यांनी केले. बैठकीस संजय गांधी समिती सदस्य श्री. रविंद्र भरतसिंग गिरासे, श्री स्वरुप किशोर बोरसे, इकबाल सुलेमान खाटीक, श्री. भास्कर सुकलाल पाटील, श्रीमती रंजनाबाई राजेश नाईक, श्री. रविंद्र गोपीनाथ पठाडे हे उपस्थित होते. तर अर्जाची योजनानिहाय वर्गवारी करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे यासाठी श्रीमती मंगला वसावे, श्रीमती प्रिती पाटील, श्री. गणेश पाचोरे तसेच श्री चेतन सोनार यांनी कामकाज पाहिले.