नंदुरबार- येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार दऊन सन्मानित करण्याचा सोहळा थाटााात पार पडला. मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणारे शिक्षण न देता त्या माहितीमागील संकल्पना स्पष्ट करुन सांगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट असल्यास प्राप्त ज्ञानाचा वापर विद्यार्थी त्यांच्या जीवनात करू शकतील आणि त्यातून समाजोपयोगी विद्यार्थी घडून राष्ट्रनिर्माणास हातभार लागेल; असेही त्यांनी सांगीतले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ , प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी , माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिद्र कदम , प्राथमिक उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे , डॉ.युनूस पठाण उपस्थित होते.
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . त्यात नंदुरबार तालुक्यातून जि.प .शाळा, रनाळेखुर्द शाळेचे शिक्षक पंकज गोरख भदाणे , नवापूर तालुक्यातून जि.प.शाळा , धुडीपाडा शाळेचे शिक्षक मदन श्रीधरराव मुंडे, शहादा तालुक्यातून जि.प . कन्या शाळा , प्रकाशाचे शिक्षक रविंद्र भाईदास पाटील , तळोदा तालुक्यातून जि.प . शाळा , रेवानगर पुनर्व . क्र .3 चे शिक्षक हेमंत रामा ठाकरे , अक्कलकुवा तालुक्यातून जि.प.शाळा खटकुवा चे शिक्षक भरत कमजी तडवी , धडगांव तालुक्यातून जि.प.शाळा , कुंभारपाडा शाळेचे शिक्षक दिनकर बहादूर पावरा तसेच महिला विशेष पुरस्कार अंतर्गत जि.प. शाळा , राजापूर तालुका नंदुरबार शाळेच्या शिक्षिका रोहीणी दिलीप बाविस्कर यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी केले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . वर्षा फडोळ , माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिद्र कदम , प्राथमिक उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले . याप्रसंगी रांगोळी रेखाटन करणाऱ्या एस.ए.मिशन हायस्कुलच्या विद्यार्थीनी , गीतगायन सादर करणाऱ्या श्रॉफ हायस्कुलच्या विद्यार्थीनी , रिमोटद्वारे दिपप्रज्वलन तसेच प्रतिमापूजन उपक्रम साकारणारे एकलव्य हायस्कुलचे शिक्षक मिलींद वडनगरे तसेच सुत्रसंचलन करणारे शिक्षक किरण दाभाडे यांचादेखील यथोचित सत्कार करण्यात आला. प्राथमिक शिक्षण विभागाचे सुनिल गिरी , मयुर वाणी, प्रशांत पवार , रविंद्र बच्छाव यांनी परिश्रम घेतले .