शिरपूर – राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नविन मतदार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू असून त्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यामूळे सामान्य व गरीब व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी ती ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी प्रदेश तेली महासंघ युवक आघाडीचे राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने वंचित व १८ वर्ष पूर्ण होण्याऱ्या नविन युवक युवती व व्यक्तींसाठी नवीन मतदार नोंदणी साठी व विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात पुढे भविष्यात होणाऱ्या निवडणुकीपासून कोणीही व्यक्ती वंचित राहू नये यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे ही नवीन मतदार नोंदणी मोहीम ही ऑनलाईन पद्धतींत सुरू आहे त्यामुळे खूप अडचणी येत आहेत ऑनलाइन करतांना वेबसाईट चालत नाही, सुरू झाली तर अनेक तास ते दाखल होत नाही व शेवटी दाखल होतांना ते बाहेर निघून जाते. दाखल झाले तर पावती निघत नाही निघाली तर चुकीची होते पत्तानुसार दाखल केल्यास ते दुसऱ्याच भागात नोंदणी होते त्यामुळे सदरील व्यक्तीचे नाव हे दुसऱ्याच भागात गेल्यामुळे त्याचे नाव ही सापडत नाही त्यामुळे तो मतदानापासून वंचित राहतो त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी व ती ऑफलाईन पद्धतीने करून न्याय देण्यात यावा
प्रत्येक भागासाठी मतदान नोंदणीसाठी बी एल ओ ची नेमणूक केलेली आहे परंतु ते कधीही नेमणूक केलेल्या भागात फिरत नाहीत नेमणूक केलेल्या मतदान केंद्रावर ही बसत नाहीत त्यामुळे मतदार नाव नोंदणीसाठी फिरून परेशान होत असतो व वंचित राहतो अशिक्षित व्यक्तीला ऑनलाइन करता येत नाही ऑनलाईन साठी गेल्यास सेवा केंद्रावर गेल्यास ते आर्थिक लूट करतात त्यामुळे गरीब माणूस यास सर्व दृष्टीने मार बसतो बी एल ओ ना ही मतदान केंद्रावर बसवून ऑफलाईन फॉर्म भरून घ्यावेत.
ऑनलाइन मतदार नोंदणी केल्यास मतदान ओळख पत्रही ही येत नाही अनेक वेळा फेऱ्या मारूनही शेवटपर्यंत मिळत नाही त्यामुळे पुरावा म्हणून ओळखपत्र पासून वंचित राहावे लागते त्यामुळे नाव नोंदणी ऑनलाईन न करता ऑफलाईन पध्दतीने करण्याची मागणी प्रदेश तेली महासंघातर्फे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन प्रदेश तेली महासंघाचे राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी निवेदन देतेवेळी प्रदेश तेली महासंघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी,, युवक महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष आशिष चौधरी, तालुकाध्यक्ष दुर्गेश चौधरी, शहराध्यक्ष सुनील चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष महेश चौधरी, नरेश चौधरी, उपाध्यक्ष मनोज चौधरी, राजू चौधरी, मिलिंद चौधरी, दिनेश चौधरी, जयेश चौधरी युवराज(धोंडू) चौधरी, भरत चौधरी, मिलिंद चौधरी,आकाश चौधरी, सेवा महासंघ जिल्हा सरचिटणीस चेतन चौधरी, तालुकाध्यक्ष रमेश चौधरी, सुनिल चौधरी कुवे, उत्तम चौधरी किरण चौधरी,गणेश चौधरी डी सी, श्री विघ्नहर्ता संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश चौधरी, उपाध्यक्ष सुनिल चौधरी, दिपक चौधरी, कैलास चौधरी,सोहन चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रतीक ईशी,मयूर ईशी ,यांचेसह पदाधिकारी यांनी केली आहे.