नेहरुचौक ते सुभाषचौक रस्त्याला हुतात्मा शशिधर केतकरांचे नाव द्या; कळवणकर यांची मागणी

नंदुरबार – शहरातील नेहरुचौक ते सुभाषचौक रस्त्याचे हुतात्मा शशिधर केतकर मार्ग असे नामकरण करावे; अशी मागणी नंदुरबार नगर परिषदेतील भाजप चे नगरसेवक तथा विरोधी गट नेता कळवणकर यांनी केली आहे.
1942 ला ब्रिटिश सरकार विरोधात गांधीजींनी छेडलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होत नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकविण्यासाठी रॅली काढून इंग्रजांविरोधात घोषणा दिल्या होत्या. त्याप्रसंगी ब्रिटिशांच्या पोलीस दलात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी निर्दयपणे गोळीबार केला होता आणि एकापाठोपाठ पाच किशोरवयीन लहानग्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जय घोषणा देत गोळ्या झेलून आपले प्राण त्यागले होते.  अग्रभागी असलेल्या शिरीष मेहता याचे आणि
त्याच्यासोबत प्राण त्यागणारे त्याचे अन्य मित्र यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. हुतात्मा स्मारकाच्या रूपाने त्या सर्वांच्या स्मृती नंदुरबार वासियांनी अमर ठेवल्या आहेत. शिरीष मेहता यांच्या वास्तू च्या स्वरूपातील आठवणी देखील जपण्यात आलेल्या आहेत. परंतु शशिधर केतकर आणि अन्य बाल हुतात्म्यांच्या विषयी तुलनेने प्रयत्न झालेले नाहीत.
दरम्यान भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा विरोधी घटनेचा गट नेता चारुदत्त कळवणकर यांनी अमृत महोत्सवी वर्षाचे अवचित्य साधून हा विषय नंदुरबार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष यांच्याकडे निदर्शनास आणून दिला असून शहीद शशिधर केतकर मार्ग असे नामकरण करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे.
चारुदत्त कळवणकर यांनी त्या पत्रात म्हटले आहे की,  आझादी का अमृतमहोत्सवी वर्षात नंदुरबार नगरपालिकेच्यावतीने शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी घरांना नगरपालिकेच्यावतीने तेथे नाव लावण्यात आले आहेत. मात्र हुतात्मा शशिधर केतकर या बाल शहीदांची राहणारी वास्तु केतकर वाडा आज जमिनदोस्त झाला आहे. तेथे खाजगी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. नंदुरबार नगरपालिकेची भव्य इमारत बाजुला तयार झाली आहे. नेहरु पुतळ्यापासून ते सुभाष चौकापर्यंत सदरील रस्त्याला हुतात्मा शशिधर केतकर मार्ग असे नामकरण करण्यात यावे, ही विनंती. हीच खरी नंदुरबारच्या हुतात्म्यांना श्रध्दांजली ठरेलठरेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!