नंदुरबार – येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राष्ट्रीय महिला आयोग यांचे संयुक्त विदयमाने पॅन इंडिया कायदे विषयक जनजागृती व पोहच या मोहिमेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात महिला सक्षमीकरण, महिलांचे हक्क व अधिकार या विषयावर कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आले. सदर कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या. डी.व्ही. हरणे, वरिष्ठ स्तर, सह दिवाणी न्या. आर.एन. गायकवाड, महा. राज्य महिला आयोग जिल्हा समन्वयक अॅड. उमा चौधरी,अॅड.सीमा खत्री, अॅड. दिपाली रघुवंशी, अॅड. शुभांगी चौधरी
अदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमात न्या.डि.व्ही.हरणे यांनी महिलांचे अटकेबाबत चे अधिकार व इतर अधिकाराबाबत मार्गदर्शन केले. न्या.आर.एन. गायकवाड, यांनी सायबर क्राईम व महिलांची फसवणूक या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड उमा चौधरी यांनी,महिलांचे हक्क या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सीमा खत्री यांनी महिलांचे सक्षमीकर व महिलांचे/बालकांचे लैंगिक छळांपासून संरक्षण करणारे कायदे याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. दिपाली रघुवंशी यांनी महिलांचे खावटीचे अधिकार तसेच महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा याबाबत मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन शुभांगी चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रम आयोजित करण्या संबंधी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्या. आर.एस. तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील छायाचित्रात नंदुरबार येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राष्ट्रीय महिला आयोग यांचे संयुक्त विदयमाने पॅन इंडिया कायदेविषयक जनजागृती व पोहच या मोहिमेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात महिला सक्षमीकरण, महिलांचे हक्क व अधिकार या विषयावर कायदे विषयक शिबीरात मार्गदर्शन करतांना अॅड. सीमा खत्री,न्या.आर.एन. गायकवाड, न्या. डी.व्ही. हरणे