पुन्हा धाडसी कारवाई ! अवैध मद्यसाठ्यासह 62 लाखाचा मुद्देमाल जप्त; गुजरात सिमेवर वक्र नजर

नंदुरबार – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर गुजरात सीमेलगत हॉटेल तापी परिसर समोर धाडसी कारवाई करून पुन्हा परराज्यातील विदेशी मद्याचा कंटेनरसह 62 लाख 76 हजार 480 चा मुददेमाल जप्त केला. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नंदुरबार अधीक्षक युवराज ठाकुर यांच्या मार्गदर्शनात महिनाभरात झालेली ही दुसरी धाडसी कारवाई आहे. तीन आठवड्यांपूर्वीच याच महामार्गावर राठोड यांनी 38 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यापाठोपाठ झालेली ही मोठी कारवाई आहे.

कमी मनुष्यबळ उपलब्ध असताना नंदुरबार विभागातील अधीक्षक युवराज राठोड व निरीक्षक चकोर यांचे भरारी पथक सध्या ॲक्शन मोड मध्ये आल्याबद्दल  विभागात कौतुक केले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नंदुरबार अधीक्षक युवराज राठोड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, दि. 08 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप व (अं व द) राज्य उत्पादन शुल्कच्या संचालक श्रीमती वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक उत्पादन शुल्क नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली. या विभागाकडून देण्याात आलेल्या माहितीनुसार ब-हाणपुर अंकलेश्वर रस्त्यावर हॉटेल तापी परिसर येथे पॅक बॉडी असलेला कंटेनर (क्रमांक GJ-15-AT-6007) ची तपासणी केली असता परराज्यातील विदेशी मद्याचे एकूण 488 बॉक्स आढळले. वाहनासह मनोजकुमार मखनलाल बिश्नोई यास अटक करण्यात आली. परराज्यातील या विदेशी मद्याची एकुण (488 बॉक्स हरियाणा राज्य निर्मिती व विक्री साठी असलेले) किंमत 44 लाख 76 हजार 480 रुपये ईतकी आहे. पॅक बॉडी कंटेनरसह एकुण 62,76,480/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65(अ) (ई).80,81,83,90,98(2),103 108. व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 420,465,468,471 अन्वये करण्यात आली.
  डी.एम. चकोर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, पो.जे. मेहता दुय्यम निरीक्षक हंसराज चौधरी, हेमंत डी पाटील श्री. हितेश जेठे, अविनाश पाटील इत्यादींनी यशस्वीरीत्या पार पाडली सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. डी. एम. चकोर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!