पुन्हा वास्तव्य आढळल्याने चाैघा हद्दपारांची केली उचलबांगडी

      नंदुरबार – जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले 4 आरोपी पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातच वास्तव्य करताना आढळल्यामुळे त्या चौघांची धरपकड करीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.
     पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक- 2021 व नवरात्रोत्सव काळात जिल्ह्यात कायद व सुव्यवस्था अबाधीत रहावी याकरीता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे यापुर्वी नंदुरबार जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीसाठी दोन टोळ्यांमधील 14 आरोपी व 1 वर्ष कालावधीसाठी एका टोळीतील 5 आरोपी तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे 04 आरोपी असे एकूण 23 आरोपींना नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
     हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींना नंदुरबार जिल्ह्याबाहेर गुजरात राज्यात त्यांचे नातेवाईकांकडे सोडण्यात आले होते. परंतु त्यातील काही सराईत गुन्हेगार हे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांची कुठलीही परवानगी न घेता नंदुरबार जिल्ह्यात फिरतांना आढळले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमी दाराकडून ही माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने स्वतंत्र पथक तयार करुन संतोष दिलीप तिजविज, वय 21 रा. बाहेरपुरा, महेंद्र धरम ठाकरे वय 26 रा. डामरखेडा ता. शहाद, गोरख मोहन ठाकरे वय 20 रा. डामरखेडा ता. शहादा, महेंद्र धरम ठाकरे वय 26 रा. डामरखेडा ता. शहादा  या फरार घोषित केलेल्या आरोपींवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे नंदुरबार शहर व शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले.
      ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे. शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीर निरीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक राकेश मोरे, राकेश वसावे, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे पोलीस अमंलदार विजय ढिवरे, किरण मोरे, अभय राजपुत आनंदा मराठे, यशोदिप ओगले यांचे पथकाने केली असून पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांनं पथकाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!