वाचकांचे पत्र:
बुके,पुष्पगुच्छ, हार तुरे,यांना फाटा देऊन आता जनमानसात ग्रंथभेटीचा संस्कार रुजवावा लागेल
आज समाजात विविध सण, उत्सव साजरे केले जातात, वाढदिवस, मंगल सोहळे, विवाह, वास्तुशांती, मुंज,किंवा वर्धापनदिन यासारख्या सोहळ्यात बुके आणि पुष्पगुच्छ देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. पण काही क्षणही त्यांचं अस्तित्व त्या यजमानाच्या मनात राहत नाही, यासाठी त्यांच्या जीवनाला दिशा देणारी अशी भेटवस्तू देणे आवश्यक ठरते आणि आता जनमानसात संस्कार, नीतिमत्ता, संस्कृती रुजविणे आवश्यक आहे. तसेच आजची युवापिढी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात समरस झालेली दिसते. मात्र तेथे जेवढे फायदे आहेत त्या पेक्षा तोटेही आहेत. वाईट प्रवृत्ती लवकर आत्मसात केली जाते. चांगले गुण जीवनात आनंद देतात मात्र ते जीवनात स्वीकारण्याचे प्रमाण अल्प आहे. यासाठी स्वतःचे जीवन आनंदी करण्यासाठी स्वतःतील स्वभावदोष उदा, राग येणे, विसरळूपणा,अपेक्षा असणे,मनाप्रमाणे व्हावे असे वाटणे, अहंकार, या दोषांमुळे आपण कधीही समाधानी जीवन जगू शकत नाही आणि समाजात चुकीची म्हण रूढ आहे, ‘स्वभावाला औषध नसते’, पण स्वभावाला औषध आहे हे सनातन निर्मित ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतील, यामध्ये दोष निर्मूलन कशा प्रकारे करावे ? प्रत्यक्ष प्रक्रिया काय करावी? व्यक्तीमत्व विकास कसा साधावा ? आणि जीवन आनंदी कसे करावे याविषयी सखोल अभ्यास केला आहे. खरोखरच जीवनाला दिशादर्शक असे हे ग्रंथ आहेत, यात शंकाच नाही. आजच्या स्वार्थी जीवनप्रणालीमध्ये परोपकार करण्याची मानसिकता म्हणजे माणुसकी पुन्हा सर्वामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.
– रवींद्र हेम्बाडे, जळगाव