पोटनिवडणूक मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक

नंदुरबार : जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान करायला जातांना मतदाराला ओळख पटविण्यासाठी छायाचित्र, मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. मतदार ओळखपत्र नसेल तर इतर 17 पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

शासकीय माहितीत म्हटले आहे की, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, आधार ओळखपत्र, केंद्र सरकार, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्या. कंपनी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र,राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती,विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यांदीचा फोटोसहीत दिलेले प्रमाणपत्र.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहीत दिव्यांगत्वाचा दाखला, मालमत्तेबाबतची कागदपत्रे तसेच नोंदणी खत इत्यादी (फोटोसहीत), फोटोसहीत देण्यात आलेला शस्त्रास्त्राचा परवाना,राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र,निवृत्त कर्मचाऱ्याचे फोटो असलेले पासबुक,निवृत्त कर्मचाऱ्याचे विधवा, अवलंबित व्यक्ती यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र,वयस्कर निवृत्ती वेतनधारक अथवा त्यांच्या विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र, केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत कार्ड तसेच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेली शिधापत्रिका (कुटूंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल तसेच जर शिधापत्रिकेवर एकाच व्यक्तींचे नाव असल्यास त्याने स्वत:च्या वास्तव्याचा अन्य पुरावा जसे वीज वापराचे देयक, दूरध्वनी वापराचे देयक, प्रॉप्रटी कार्ड किंवा घरपट्टी भरल्याची पावती सोबत आणणे बंधनकारक असेल)

वरील 17 पैकी एक ओळखपत्र असल्यास मतदान करता येईल, असे उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) तथा नोडल अधिकारी जि.प.व पंचायत समिती पोटनिवडणूक, कल्पना निळे-ठुबे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!