नंदुरबार – जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण / उत्सवांच्या काळात किरकोळ कारणांवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत आंतरजिल्हा चेक पोस्ट तयार करणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील शहरांमध्ये येण्याचे ठिकाण ( Entry Point) व बाहेर पडण्याचे ठिकाण (Exit Point) याबाबत आढावा घेवून जिल्ह्यांतर्गत व गुजरात मध्यप्रदेश राज्यांच्या सिमेलगत नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस ठाणे अंतर्गत 15 चेक पोस्ट स्थापन करुन त्याठिकाणी एकुण 08 पोलीस अधिकारी व 36 शस्त्रधारी पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले असून शहरात येणाऱ्या व शहरातून जाणाऱ्या सर्व लहान मोठ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. सदरचे चेक पोस्ट हे 24 तास तैनात राहणार आहेत.
आगामी काळात साजरे होणारे सण / उत्सवांच्या काळात स्थापन करण्यात आलेले चेक पोस्ट खालीलप्रमाणे आहेत.
नंदुरबार शहर 1) साक्री नाका 2) कोरीट नाका 3) बायपास उड्डाणपुल (शहादाकडे जाणा-या रस्त्यावर)
नंदुरबार तालुका – ठाणेपाडा नाका, नळवा नाका, धानोरा नाका (खांडबाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर)
नवापूर – विसरवाडी, खांडबारा चौफुली, बेडकी नाका
शहादा- दरा फाटा, सारंग खेडा, अनरद बारी नाका म्हसावद
धडगांव – खेडदिगर नाका 1) भुशा नाका 2) काकरपाटी नाका
अक्कलकुवा – मोलगी रोड नाका
तळोदा – कुकरमुंडा फाटा नाका