प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे यांचा दौरा यशस्वी करा; ना.डॉ.विजयकुमार गावित यांचे बैठकीत आहवान

नंदुरबार – भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करावेत; असे आवाहन आदिवासी विभागाचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.
नंदुरबार येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय “विजयपर्व” येथे झालेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ना.डॉ.विजयकुमार गावित बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी होते. याप्रसंगी बोलताना डॉ.विजयकुमार गावित म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नंदुरबार येत असल्याने कार्यक्रम गुणात्मक व संख्यात्मक दृष्टिकोनातून चांगला झाला पाहिजे. नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या माध्यमातून झाले पाहिजे; असे देखील डॉ.विजयकुमार गावित यांनी यावेळी सूचित केले.
 भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे एक प्रभावशाली नेते व प्रभावशाली वक्ते आहेत. त्यांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यामुळे येथे संघटनात्मक बळकटी प्राप्त होणार असून दिनांक 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या त्यांच्या आगमनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने समर्पित होऊन स्वागतासाठी सज्ज व्हावे; असेही विजय चौधरी म्हणाले.
यावेळी मंचावर भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, सरचिटणीस राजेंद्र गावित, सरचिटणीस जितेंद्र जमदाडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य दीपक बापू पाटील, आदिवासी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, तालुकाध्यक्ष भरत गावित, तळोदा नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी जिल्हा सचिव संदीप अग्रवाल आदी उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या प्रथेप्रमाणे वर्ग गीताने सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश माळी यांनी केले. तर आभार प्रकट राजेंद्र गावित यांनी केले. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!