‘प्री वेडिंग शूटिंग’ची प्रथा जैन संघ करणार बंद

वडगावशेरी (पुणे) – येथील प. पू. प्रीतिसुधाजी, प.पू. मधुस्मिताजी यांच्या प्रेरणेने, तसेच श्री महावीरजी नहार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील ३६ जैन संघांच्या उपस्थितीत १९ सप्टेंबर या दिवशी सुसंस्कार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व संघप्रमुखांच्या स्वाक्षरीसहित ‘प्री वेडिंग शूटिंग’ची (विवाहापूर्वी जोडप्यांचे केले जाणारे छायाचित्रण) हानीकारक प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ज्या कुटुंबांमध्ये अशा पद्धतीने विवाह होत असेल, त्या विवाहाचा समाजातील मुख्य पंच निषेध करतील आणि विवाहामध्ये सहभागी होणार नाहीत, असा ठराव संमत करण्यात आला. या वेळी जैन संघाचे प्रमुख श्री. विजयकांतजी कोठारी, श्री. पोपटलालजी ओस्तवाल, प्रा. अशोकजी पगारिया, श्री. चंद्रकांतजी पगारिया उपस्थित होते.
‘प्री वेडिंग शूटिंग’ म्हणजे विवाहापूर्वी जोडप्यांचे केलेले छायाचित्रीकरण ! हे छायाचित्रीकरण सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसारित केले जाते. यातून मुलींचे प्रदर्शन मांडले जाते. ही प्रथा अयोग्य असून तिचा (गैर फायदा) अपलाभही घेतला जाऊ शकतो, त्यामुळे ही हानीकारक प्रथा बंद करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. विवाहाच्या निमित्ताने ‘प्री वेडिंग शूटिंग’ यांसारख्या अशास्त्रीय कृती टाळून विवाहविधीचे पावित्र्य जोपासण्याचा जैन संघाचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे.

One thought on “‘प्री वेडिंग शूटिंग’ची प्रथा जैन संघ करणार बंद

  1. आज के ये वेस्टन जमाने ने हमारे समाज को बहुत ही पिछे कर दियाहै। फ्रि वेडिंग और ये जो रिसोट्र्स मे और बडी बडी होटल मे शादिया करनी ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!