एनडीबी न्यूज वृत्तसेवा
नंदुरबार – स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणाच्या कार्यक्रम प्रसंगी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंतराव पाटील कार्यक्रम स्थळी एकाच गाडीतून आल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावरून विविध तर्क लावलेे जात असले तरी प्रत्यक्ष प्रसंग निराळा होता, असेेे उपस्थित पदाधिकाऱ्यांचे म्हणणेे आहे.
याविषयी अधिक वृत्त असे की शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे ण्णासाहेब पिके पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर सभास्थळी म्हणजे पाटीदार मंगल कार्यालयात जाण्याची एकच घाई सर्व उपस्थित नेत्यांना झाली होती. सभास्थळ तिथून अवघे चार-पाच मिनिट अंतरावर होते. म्हणून मंत्री जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी आपल्या गाडीत बसवून घेतलेेे व सभास्थळी एकत्रीत आले. तथापि महाराष्ट्राचेे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केल्यापासून भाजप-सेना युती होणार किंवा नाही यावरील शक्यता अशक्यता वर्तवणारे वादळ उठलेले आहे त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री्री जयंत पाटील यांचे गाडीतून एकत्रित येणे चर्चेचा विषय बनला. त्यांनी एकमेकात युतीच्या शक्यतांवर बोलणे केले असावे काय? याविषयी तर्क्क्क लावणे चालू झाले आहे. या गोष्टीचा प्रत्यक्ष साक्षीदार मात्र कोणी अद्याप आढळलेला नाही.
यासंदर्भात असे सांगण्यात येते की, प्रत्यक्षात जयंत पाटील व देवेंद्र फडणवीस यांना किंवा अन्य नेत्यांना एकत्रित बसण्या इतपत वेळ मिळाला नाही. नासिक धुळे कडून शहाद्या पर्यंत पोहोचताना खराब रस्त्यांमुळे प्रत्येक नेत्याचे वेळापत्रक बिघडले होते. त्यामुळेच मंत्री जयंत पाटील हे या सोहळ्याचे अध्यक्ष असूनसुध्दा कार्यक्रमाच्या शेवटी भाषण करण्याचा प्रोटोकॉल पाळू शकले नाही. कार्यक्रमाच्याा सुरुवातीला थोडक्यात भाषण करून ते त्वरित निघून गेले. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. या सोहळ्याला विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना.जयंतराव पाटील, आदिवासी विकास तथा पालकमंत्री ना.ॲड.के.सी.पाडवी, पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, आ.अमरीशभाई पटेल, आ.राजेश पाडवी, माजी आ,चंद्रकांत रघुवंशी,आ.डॉ.विजयकुमार गावित, खा.रक्षा खडसे, आ.काशिराम पावरा, माजी आ.शिरीष चौधरी, आ.डॉ.सुधीर तांबे, श्रीमती कमलताई पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, बबनराव चौधरी, विभागीय संघटन मंत्री अनासपूरे, धुळे जि.प अध्यक्ष तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष भरत माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर असल्यामुळे इतके सर्व दिग्गज नेते आणि सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व्यासपीठावर असून देखील कोणतेही राजकीय चौकार-षटकार लगावले गेले नाही. म्हणून कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. दरम्यान मंत्री जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हजेरी लावली.
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. जास्तीत जास्त उमेदवार निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मराठवाड्याच्या दौरा आटपून पुढील महिन्यात मी पुन्हा पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार करण्यासाठी येईन असे प्रतिपादन जलसंपदामंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले. शहादा येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी आ.उदेसिंग पाडवी,जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी,मोहन शेवाळे ,बी.के पाडवी,युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, धुळे जिल्हा परिषदेचे गटनेते पोपटराव सोनवणे, युवा नेते राऊ मोरे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड दानिश पठाण आदी उपस्थित होते.