फरार आरोपी गवसला गावठी कट्टा, धारदार चाकूसह

जळगाव –  मो.हाशीम मो.सलीन खान, सध्या रा.भुसावळ याच्याकडून गावठी कट्टा, धारदार चाकू असे घातक शस्त्र आढळून आले म्हणून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मो.हाशीम मो.सलीन खान हा सध्या भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फरार असून त्याच्यावर यापूर्वी देखील इतर गुन्हे दाखल आहेत.
भुसावळ येथील प्रल्हाद नगरात राहणारा मो.हाशीम मो.सलीन खान हा नशिराबाद गावात गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवीत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. निरीक्षक बकाले यांनी नेमलेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, रवींद्र पाटील यांनी यांनी मो.हाशीम मो.सलीन खान याला नशिराबाद बस स्थानकाजवळून अटक केली.पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतूस व धारदार चाकू मिळून आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!