कॅनडा सरकारने हिटलरच्या नाझी संघटनेचे चिन्ह असलेल्या स्वस्तिक बरोबरच हिंदूंच्या स्वस्तिक चिन्हावर देखील बंदी घालण्यासाठी संसदेत एक विधेयक सादर केले आहे. यामुळे कॅनडातील हिंदू संतप्त झाले असून यानिमित्त नाझींचे स्वस्तिक व हिंदूंचे स्वस्तिक यातील फरक सध्या चर्चेत आला आहे.
कॅनडामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस बंधनकारक करण्याच्या विरोधात ट्रकचालक आणि जनतेकडून आंदोलन करण्यात येत असल्याने तेथे आता आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या काळात काही जणांकडून नाझीचे स्वस्तिक हे चिन्ह असलेल्या झेंड्याचा वापर करण्यात येत आहे. यामुळे कॅनडा सरकारने सरसकट सर्व स्वस्तिकांवर बंदी घालण्यासाठी संसदेत विधेयक सादर केले आहे. ‘न्यू डेमॉक्रेटिक पार्टी’चे नेते जगमीत सिंह यांच्या समर्थनातील सदस्यांनी हे विधेयक मांडले. याला कॅनडातील हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे. जगमीत सिंह हे खलिस्तान आणि पाकिस्तान यांचे कट्टर समर्थक आहेत.
प्रथमदर्शनी दोन्ही चिन्हात साम्य वाटत असले तरी प्रत्यक्षात बराच फरक आहे. हिंदू धर्मीयांचे स्वस्तिक लाल रंगात काढले जाते. त्यातील चारही अग्रभाग उजव्या दिशेने थोडे वक्र केलेले असतात. चार टिंबही असतात जे हिटलर नाझीच्या चिन्हात नसतात. नाझीची स्वस्तिक डाव्या अंगाने तिरकस झुकलेले असते. हिंदु धर्मात स्वस्तिक चिन्हाला शुभशक्तींचे प्रतिक मानले जाते व त्यास वेद पुराण काळापासून अध्यात्मिक व दैवी महत्व आहे. तर नाझीचे स्वस्तिक केवळ हिटलरी हुकूमशाही विचारांचे प्रतीक मानले जाते.
कॅनडाच्या संसदेमध्ये खलिस्तानवादी शीख नेत्याच्या समर्थकांकडून या दोन्ही स्वस्तिकांवर बंदी घालणारे विधेयक सादर करण्यात आल्याच्या पार्श्वभुमिवर हिंदु स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक यांच्यातील फरक सांगणाऱ्या संशोधनाविषयीची माहिती श्री. शॉन क्लार्क यांनी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध केली आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने काही मासांपूर्वी विविध प्रतिकांच्या, विशेषतः हिंदु स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक यांच्या संबंधाने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे संशोधन केले आहे. हे संशोधन शोधनिबंधाद्वारे विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरही करण्यात आले आहे. महर्षि अध्यात्म विद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे त्यांचे सहलेखक आहेत.
या संशोधनाची थोडक्यात माहिती देताना क्लार्क यांनी लेखात म्हटले आहे की, हिंदु स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक यांचा तुलनात्मक अभ्यास करतांना मूळ हिंदु स्वस्तिकात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा, तर नाझी स्वस्तिकात पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळली.
हिंदु स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक दंडावर धारण करायला लावल्यावर वेगवेगळे परिणाम पहायला मिळाले. या प्रयोगात सहभागी दोघांपैकी पहिल्या व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्याने प्रयोगापूर्वीही त्यातून नकारात्मक ,000000000स्पंदने प्रक्षेपित होत होती. दुसऱ्या व्यक्तीमधून चाचणीपूर्वी सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. दंडावर नाझी स्वस्तिक बांधल्यावर पहिल्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ दुपटीने वाढून ५.७३ मीटर झाली. दुसऱ्या व्यक्तीमध्ये ५ मीटर लांबीची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ निर्माण झाली, तर त्याच्यामधील सकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट झाली.
वरील चाचणीनंतर त्यांच्या दंडावरील नाझी स्वस्तिक काढल्यानंतर, दोन्ही व्यक्ती प्रयोगापूर्वीच्या मूळ स्थितीला येईपर्यंत थांबण्यात आले. मूळ स्थिती आल्यावर त्यांच्या दंडावर हिंदु स्वस्तिक बांधण्यात आले. त्यानंतर २० मिनिटांनी केलेल्या चाचणीत पहिल्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पूर्णतः नष्ट झालेली आढळली. एवढेच नाही, तर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, जिची प्रभावळ १ मीटर होती. दुसऱ्या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मूळ ३.१४ पासून ६.२३ मीटर झाली, म्हणजे जवळ जवळ दुप्पट झाली. आपापल्या परीने वरील दोन्ही प्रतिके कशी शक्तीशाली आहेत, हे या प्रयोगातून दिसून आले. नाझी स्वस्तिकाचा ते धारण करणाऱ्यावर प्रचंड नकारात्मक परिणाम होतो, तर प्राचीन भारतीय स्वस्तिकाचा पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो, असेही शॉन क्लार्क यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.