बडगुजर समाज मंडळाने गरीबांसमवेत दिवाळी साजरी करून जोपासली सामाजिक बांधिलकी

नंदुरबार – येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ, बडगुजर समाज महिला मंडळ तसेच आई चामुंडा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब, गरजू नागरीकांना मिठाई, फराळ आणि फटाके वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी सुमारे ५० कुटूंबांना मिठाई, फराळ व फटाक्यांची किट वाटप करण्यात आली.
दिवाळी सण म्हटला की सर्वत्र आनंद आणि उत्साह दिसून येतो. सर्वत्र रोषणाई, नवीन कपडे परिधान करणे, मिठाई, फराळ आणि फटक्यांची खरेदी करणे पहावयास मिळते. परंतू गरीब, गरजू, कामगारांना पाहिजे तसा हा आनंद घेता येत नाही. याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जोपासत येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ, बडगुजर समाज महिला मंडळ तसेच आई चामुंडा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील करण चौफुली परिसरातील गरीब, गरजू नागरीकांना फराळ वाटप करुन दिवाळी साजरी केली. यावेळी बडगुजर समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता मनोज बडगुजर, सचिव रेणुका शरद बडगुजर, उपाध्यक्षा पौर्णिमा अनिल बडगुजर, सदस्या प्रिती गिरीष बडगुजर, वैशाली कैलास बडगुजर, अनिता विजय बडगुजर, बडगुजर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय संतोष बडगुजर, माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक दिलीप रोघा बडगुजर, मंडळाचे सल्लागार पंडीत तोताराम बडगुजर, सदस्य गणेश दत्तात्रय बडगुजर, विजय जगन्नाथ  बडगुजर, कैलास सुकलाल बडगुजर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!