नंदुरबार- येथील बस स्थानकावर महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र पोत ओढून लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबारच्या भोई गल्ली येथील रहिवासी सिताबाई सखाराम भोई या नंदुरबार-अक्कलकुवा बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील साडेचार ग्रॅम वजनाचे 18 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र पोत लंपास केली. याबाबत सिताबाई यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार राजू जाधव करीत आहेत.