बांगलादेशातील हिंदु असुरक्षित, भारताने जबाबदारी घ्यावी; हिंदु जनजागृतीची मागणी

नंदुरबार – बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरावर आक्रमण करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांड घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंतप्रधान यांना प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन देऊन करण्यात आली.
नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना हे निवेदन आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी देण्यात आले. याप्रसंगी इस्कॉन चे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख श्रीमान माधवशाम सुंदर दास, श्रीमान भद्रसेन दास, निखिल खलाने, धर्मप्रेमी धीरज चौधरी, जितेंद्र मराठे हिंदु जनजागृती समितीचे प्रा.डॉ.सतिष बागुल आणि राहुल मराठे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,  ‘हिंदु व्हॉईस’ वृत्त संकेतस्थळाने धर्मांधांनी श्री दुर्गादेवीची मूर्ती नदीत फेकण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, तसेच कॅमिला या भागातील 9 मंडपांवर आक्रमणे करून तेथील देवीच्या मूर्तींची तोडफोड केल्याची माहिती दिली आहे. येथे आक्रमणे अद्यापही चालू असून तणावाची स्थिती आहे. त्या परिसरातील हिंदू घाबरलेले असून तेथील पोलीस धर्मांधांना रोखण्यात अपयशी ठरले आहेत, असे म्हटले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या माहितीतून स्पष्ट होत आहे की तेथील हिंदू भयावह स्थितीत जगत असून सुरक्षित नाहीत. त्याविषयीच्या घटनांचा उल्लेख करून निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेश हा मुसलमान बहुल तथा इस्लामी देश असल्यामुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंची संपत्ती, जागा आणि महिलांची अक्षरश: लूट केली जात आहे. हिंदूं मंदिरांची तोडफोड, देवतांच्या मूर्तींचे भंजन या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. एकप्रकारे बांगलादेश हिंदूंसाठी नरक बनला आहे. तेथील सरकार ‘हिंदूंचे रक्षण करू’ असे सांगत असले, तरी तेथील धर्मांधांना ते रोखू शकत नाहीत, असे नमूद करून निवेदनात मागणी केली आहे की, जगभरात भारत हा एकमेव हिंदूंचा देश आहे. या नात्याने जगभरातील हिंदु समाजाची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे. या दृष्टीने बांगलादेशमधील हिंदू समाजाला सुरक्षा पुरवावी, यासाठी भारत सरकारने तात्काळ बांगलादेशच्या पंतप्रधानांशी थेट संवाद साधावा.
 हिंदूंवर हिंसक आक्रमणे करणार्‍या, मूर्तींचे भंजन करणार्‍या, दुर्गापूजा मंडप उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना शोधून काढावे, त्यांच्यावर आणि त्यांच्या सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
भारत सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांबाबत ‘संयुक्त राष्ट्रा’त मुद्दा उपस्थित करून या देशांवर दबाव निर्माण करावा.
 हिंदूंना सुरक्षा पुरवली नाही किंवा असेच चालू राहिले तर, बांगलादेशाशी सर्व प्रकारचे संबंध संपुष्टात येतील, तसेच त्यांच्यावर निर्बंध लादण्यात येतील, अशी ताकीद बांगलादेशच्या सरकारला द्यावी.
आपल्याकडून झालेल्या कृतीविषयी आम्हालाही अवगत करावे; असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!