नंदुरबार- तालुक्यातील नांदरखेडा-वासदरे रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन युवक जबर जखमी झाले आणि रुग्णालयात उपचार चालू असतांनाच ते मरण पावले. शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला होता व रात्री शासकीय जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी एम. एच.- १८ ईबी ७७६६ क्रमांकाच्या सुपर स्प्लेंडरवरील दुचाकीस्वार भरधाव वेगात नांदरखेडा दिशेने जात होता. त्याचवेळी एम.एच.३९ पी ७९० ही मोटारसायकलही समोरून वेगाने आली आणि दोघांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दीपल्या पोसल्या बहिरम, राहणार टाकलीपाडा, दिलवरसिंग रोप्या पाटील, राहणार नांदरखेडा आणि दुचाकी चालक संजय चैत्राम बागुल, राहणार टाकलीपाडा हे तिनही जण जबर जखमी झाले. अन्य वाहनधारक व ग्रामस्थांना घटना समजताच धावून आले व त्यांनी पुढील उपचारासाठी तातडीने नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात तिघांना दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकार्यांनी तिघांना मयत घोषित केले. याप्रकरणी सुनील वळवी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चौधरी करीत आहेत. तिघा मयतांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघातामुळे टाकलीपाडा परिसरात शोककळा पसरली असून तिघा मयतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.