‘बाबां’चे (डॉ.अवचट यांचे) जाणे चटका लावणारे..!
आज डॉक्टर अनिल अवचट अर्थात सर्वांचे लाडके बाबा गेले असा निरोप मुक्तांगण परिवाराशी संबंधित असलेला माझा मित्र दिपक पवार पाठवल्यावर बाबांविषयी च्या जुन्या आठवणी जागृत झाल्या 1992 ला पुणे येथे पत्रकारितेचा डिप्लोमा करण्यासाठीगेलो असता पुण्यात वेळात वेळ काढून कोणाला भेटायचे याची यादी तयार होती डॉक्टर अनिल अवचट सुभाष अवचट यांचे नाव अग्रभागी होते त्यानुसार एक दिवस पत्रकार कॉलनी येथे जाऊन त्यांची भेट घेतली काही काही वेळ तेथे बसलो आपण लहानपणापासून जे लेखकाला वाचत आलो त्या लेखकाचं इतका साधेपण आणि बोलण्यातला अनौपचारिक व आपुलकी चा स्वभाव मनाला पुन्हा भाऊन गेला त्यानंतर आमचे बालपणीचे मित्र व आमच्या ग्रुपचे कलावंत दिपक पवार यांचा मुक्तांगण परिवाराशी संपर्क आला असताना अनेकदा बाबांसोबत भेटण्याचा व प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला एकदा धुळे येथे मुक्तांगणच्या बैठकीसाठी बाबा आले होते त्यावेळी पत्रकार भवन येथे ठिकाणी संवाद सभा झाली होती या संवाद सभेचे सूत्रसंचालन मी केले होते ही समाज सभा सुरू होण्याच्या आधी धुळे येथील संतोषी माता चौकातील गुलमोहर विश्रामगृहात बाबां बरोबर संवाद साधण्याचा हा एक दुर्मिळ क्षण दीपक पवार याने टिपून ठेवल्यामुळे एका ऐतिहासिक आठवण म्हणून आजही जपून ठेवलाय बाबांच्या माणसं या पुस्तकाने हायस्कूलला असतांनाच आम्हाला वेड लावले होते अशीही उपेक्षित व समाजाने दूर ठेवलेली सामान्य माणसेही आपल्या लेखनाचा विषय होऊ शकतात हे बाबांनीच पुढच्या पिढ्यांना दाखवून दिले बाबांचे सामाजिक कार्य वैद्यकीय कार्य लेखन पत्रकारिता व्यसनमुक्ती क्षेत्रातले नवं पाऊल हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे बाबा त्यांच्या कार्याने आपल्यात काही कायम असतील गेल्या आठवड्यात सिंधूताई सपकाळ यांचे जाणे आणि आज बाबा गेल्याची बातमी महाराष्ट्राला निश्चितच उदासपण आणणारी आहे.
– सतिष पेंढारकर, धुळे (साक्री).