नंदुरबार – बिबट्याने हल्ला करून दहा वर्षीय मुलाला हातोहात पळविले आणि उसाच्या शेतात ओढून नेऊन लचके तोडले. या मुलाचे भेदरलेले आजोबा मात्र हतबद्ध होऊन आरडा ओरड करण्यापलीकडे काही करू शकले नाही. या दुर्दैवी बालकाचा अंत झाला असून संपूर्ण तळोदा या घटनेने हादरले आहे.
दरम्यान तळोदा तालुक्यातील वाढलेला बिबट्यांचा वावर अतिशय धोकादायक बनला असून हा विषय वारंवार ऐरणीवर येत असताना वनखात्याकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा विषय या घटनेमुळे चर्चेत आला आहे.
हादरवून सोडणारी ही घटना तळोदा तालुक्यात दलेलपूर शिवारात आज दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली. या बालकाचे आजोबा खेत्या पारशी वसावे वय 55 वर्षे धंदा हातमजुरी रा. रानमहु ता. तळोदा जि. नंदुरबार यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटले आहे की,
मुलगा दलेलपुर शिवारात गुलाब सत्तार धानका रा. दलेलपुर यांच्या कपाशीच्या शेतात कोळपणी साठी गेला होता. सोबत नातु नामे गुरूदेव भरत वसावे वय 10 वर्षे. 5 महिने, 23 दिवस हा व लहान मुलगा अरूण हे देखील गेले होते. ते परत घरी येत असतांना कपाशीच्या शेताजवळ असलेल्या ऊसाचे शेतातुन बिबटयाने हल्ला करून नातु गुरूदेव याला ऊसाचे शेतात ओढून नेले . खेत्या पारशी वसावे यांनी आरडा ओरड केल्याने बिबटयाने गुरुदेव याला जखमी अवस्थेत सोडून दिले व निघून गेला.
तेव्हा खेत्या याने नातु गुरूदेव याला ऊसाचे शेतातुन बाहेर काढून कपाशीच्या शेतात आणुन लागलीच खाजगी वाहनाने औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल केले. परंतु डॉ. पावरा यांनी तपासुन नातु- गुरुदेव वसावे यास मयत घोषित केले सदर अकस्मात मृत्यूची पुढील चौकशी पोनि राहुलकुमार पवार यांच्या आदेशाने पोना डेविड पाडवी करीत आहेत.