नंदुरबार – अभ्यासू व कर्तव्य दक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी पोलीस मुख्यालयात येथील बॉडी बिल्डर विपुल राजपूत यांचे विशेष अभिनंदन करुन कौतुक केले. एच.जे.पी.फिटनेस क्लबचे मुख्य संचालक तथा पुणे श्री सुवर्ण पदक विजेते विपुल हेमंतसिंह राजपूत यांनी तेलंगाना (हैदराबाद) येथील नरेश सूर्या क्लासिक एक्स्पो-२०२१ आयोजित राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत कास्यपदक पटकावून आणखी एक भव्य कागगिरी करून दाखवली. म्हणून पोलीस दलाच्या वतीने अधीक्षक पी आर पाटील यांनी ही विशेष शाबासकी दिली.
या प्रसंगी विपुल राजपूत यांच्या कडून अधीक्षक पी.आर. पाटील यांनी स्पर्धेविषयी माहिती जाणून घेत चर्चा केली.
हैद्राबाद (तेलंगणा)येथे नुकत्याच नरेश सुर्या क्लासिक एक्सपो तर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बाँडीबील्डींग स्पर्धेत 80 ते 90 किलो वजनी गटात ३ रा क्रमांक घेत कास्यपदक मिळवील्या बद्दल पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी विपुल राजपुत यांचे अभिनंदन केले. मी सुध्दा कोल्हापूर येथे तालीमला जात होतो तेथे मि कुस्तीच्या स्पर्धेत भागही घेत असे. युवकांनी मोठ्या संख्येने अशा गोष्टींसाठी पुढे यावे. त्या साठी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळवून देण्यास आम्ही तयार आहोत, असेही अधीक्षक पाटील याप्रसंगी म्हणाले व शुभेच्छा दिल्या. तर विपुल राजपूत यांनी, आता याहून मोठ्या स्पर्धेत कामगिरी करून दाखवण्याचा मानस असून त्यादृष्टीने तयारी करीत असल्याचे सांगितले. या प्रसंगी अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे व अन्य अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी देखील विपुल राजपूत यांचे विशेष अभिनंदन केले. कुणाल चौधरी, पत्रकार रत्नदिप पाटील, कुलदीप पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.